Weekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा देणारा आठवडा
Weekly Horoscope 16 to 22 december 2024 in Marathi : डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्याचा हा तिसरा आठवडा सूर्य संक्रमणाने सुरु होणार आहे. सोमवार 16 डिसेंबरपासून खरमासला सुरुवात होणार आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश केल्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. पण 5 राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. कामात प्रगतीसह व्यवसायात यश आणि आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून
1/12
मेष (Aries Zodiac)
या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिन्यातील तिसरा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक फायदा घेऊन आलाय या आठवड्यात प्रगतीसह गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळणार आहे. त्यामुळे आयुष्यात आनंदच आनंद असेल. पैसा मिळविण्यासाठी कार्यक्षमता आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढणार आहे, त्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मालमत्ता खरेदी आणि कुटुंबावर या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे.
2/12
वृषभ (Taurus Zodiac)
या लोकांसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा संमिश्र असणार आहे. आर्थिक बाबतीत देखील उतार चढाव पाहिला मिळतील. आठवड्याची सुरुवात प्रसन्न राहणार आहे. बँक बॅलेन्समध्ये वाढ होणार आहे. कष्टाचे सोनं होणार आहे, तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल तसंच करिअरमध्ये प्रगती होणार आहे. व्यावसायिक भागीदारांसोबतच्या नात्यात अधिक गोडवा असणार आहे.
3/12
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खर्चिक असणार आहे. तुम्हाला परदेश प्रवासातून घवघवीत यश प्राप्त होणार आहे. तुमची आर्थिक स्थितीदेखील सुधारणार आहे. अडकलेले पैसे तुमच्याकडे परत येणार आहे. तुमच्या कौशल्यामुळे आर्थिक फायदा मिळणार आहे. प्रगती आणि सुख समृद्धीचा हा आठवडा असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. व्यवसायत यश मिळणार आहे. संपत्ती वाढ, प्रतिष्ठा वाढणार आणि आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे.
4/12
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशाने भरलेला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. प्रॉपर्टी आणि शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा मिळणार आहे. मात्र सोमवार आणि मंगळवारी खर्च अधिक होईल तर काळजी घ्या. या आठवड्यात मनाचं ऐकून निर्णय घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. गुंतवणुकीतूनही फायदा मिळेल. आठवड्याच्या मध्यात काही कारणाने पैशाबाबत तणाव राहू शकतो. पण तुमच्या बुद्धीने सर्व काही लवकरच मार्गी लागेल. आठवड्याच्या शेवटी अचानक आर्थिक फायदा होणार आहे.
5/12
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी फायदा मिळणार आहे. प्रकल्पाच्या यशामुळे आर्थिक लाभ मिळणार आहे. गुंतवणुकीत तेजी आणि आर्थिक लाभही तुम्हाला मिळणार आहे. आठवड्याच्या मध्यात खर्चात अचानक वाढ होणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष देणं गरदेचे आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारणार असून आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीचा हा आठवडा आनंद आणि समृद्धी घेऊन आलाय.
6/12
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवड्याच्या सुरुवातीला नशीब साथ देणारा ठरणार आहे. आर्थिक लाभ होणार असून कार्यक्षेत्रातूनही पैसा वाढणार आहे. या महिन्यात मालमत्तेशी संबंधित समस्या होऊ शकते. मात्र आठवड्याच्या मध्यात तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे. डिसेंबरमध्ये मालमत्तेतून लाभ मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढेल आणि आर्थिक बाबतीत फायदा देणारा हा आठवडा असणार आहे.
7/12
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे, कारण अचानक खर्च वाढणार आहे. सोमवार आणि मंगळवारी परिस्थिती सुधारेल आणि पैसा तुमच्या खिशात राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. शेअर बाजारातूनही फायदा मिळणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळणार असून यशाची गोडी तुम्ही अनुभवणार आहात.
8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून आर्थिक फायदा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी पैसाही वाढणार असून तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार आहे. सोमवार आणि मंगळवारी अधिक खर्च होणार आहे. आठवड्याच्या मध्यात नशीब तुमची साथ देणार आहे. महिलांना आर्थिक यश मिळणार आहे. कामातून आर्थिक लाभही होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक वाढविण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येणार आहे.
9/12
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत संमिश्र ठरणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतता आणि एकता राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नफा मिळणार असून तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक मदतही मिळेल. बुधवार आणि गुरुवारी खर्चिक ठरणार आहे. शुक्रवारी नशीब तुमची साथ देणार असून तुम्हाला धनलाभ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळण्याची वेळ आलीय.
10/12
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक प्रगतीसाठी चांगला सिद्ध होणार आहे. कठोर परिश्रमाने आर्थिक लाभ होणार आहे. ऑफिसची कामेही मनापासून पूर्ण करणार आहात. आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील नफाने होणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुमच्या जोडीदाराकडून अचानक आर्थिक लाभ होणार आहे. शुक्रवारी खर्च अधिक असणार आहे. तुम्हाला अचानक मोठ्या खर्चाचा सामना करावा लागणार आहे.
11/12
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. मातृसत्ताक महिलेकडून तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. बुधवार आणि गुरुवारी तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदाराची मदत मिळणार असून तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असणार असून तुमचा आनंद आणि समृद्धीत वाढ होणार आहे.
12/12