विराटचा Number कोणत्या नावाने Save केला आहेस? Anushka Sharma चं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर

Virat Kohli Mobile Number Anushka Sharma: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघेही सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेत असलेलं सेलिब्रिटी कपल आहे. दोघांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटपासून ते रिअल लाइफमधील घडामोडींपर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत असतात. त्यात हे दोघे एकाच कार्यक्रमाला मुलाखतीसाठी आले आणि त्यांनी एकमेकांची गुपितं उघडं केली तर विचारायलाच नको. असंच काहीसं घडलं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जेव्हा अनुष्काला तिने विराटचा मोबाईल नंबर कोणत्या नावाने सेव्ह केलाय असा प्रश्न विचारण्यात आला.

Swapnil Ghangale | May 29, 2023, 17:33 PM IST
1/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात नावाजलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी आघाडीचं नाव म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा! (सर्व फोटो - ट्विटरवरुन साभार)

2/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

भारताचा माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने दमदार पुनरागमन केलं असून यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये 2 शतकं झळकावली आहेत. तर दुसरीकडे अनुष्काही चित्रपटसृष्टीमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

3/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

विराट आणि अनुष्का दोघेही तसे अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देतात, व्यक्त होतात. म्हणजे कधी अनुष्काच्या फोटोशूटच्या पोस्टवर विराट कमेंट करतो. तर कधी अनुष्का विराटच्या शतकानंतर इन्स्ताग्रामवर स्टोरी पोस्ट करते.

4/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

विराट आणि अनुष्का आयडिएल कपल असल्याचं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. हे दोघे जितके डिजीटल माध्यमातून मज्जा मस्ती करतात तसेच हे खऱ्या आयुष्यातही आहेत. नुकतीच या दोघांनी बंगळुरुमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली त्यात याचा प्रत्यय आला.

5/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

बंगळुरुमध्ये एका स्पोर्ट्स कंपनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विराट आणि अनुष्काने अगदी हलक्यापुलक्या गप्पा मारल्या. एकमेकांबद्दलची गुपितं सांगितली अगदी एकमेकांची नक्क करत लोकांना खदखदून हसवलं.

6/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

मुलाखतीदरम्यान अनुष्का शर्माने 'बॅण्ड बाजा बारात' चित्रपटामधील एक डायलॉग ऐकवला. त्यावर विराटने रणवीर सिंहच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं. ”प्यार, व्यापार की जोड़ी कभी नहीं बैठती. ना भैया, मैं तो सिंगल ही बेस्ट हूं,” अनुष्काने हा संवाद म्हणताच विराटने, "बिजनेस कर ले मेरे साथ, ब्रेड पकौड़े की कसम. कभी धोखा नहीं दूंगा," असं म्हणताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विराटला दाद दिली.

7/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

अनुष्काने विराट विकेट गेल्यानंतर कसं सेलिब्रेशन करतो याची नक्कलही करुन दाखवली. इकडे तिकडे धावणे, ओरडणं, हवेत पंच मारणं यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून अनुष्काने विराटची नक्कल केली. त्यानंतर अनुष्काने हसत हसत, "कधी कधी गोलंदाज सेलिब्रेट करत नाही इतकं विराट सेलिब्रेट करतो," असं म्हटलं. हे ऐकून विराटने हसतच, "चल बस, नंतर मला या साऱ्या गोष्टींची फार लाज वाटते," असं म्हटलं. 

8/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

या कार्यक्रमामध्ये विराट आणि अनुष्काबरोबर प्रश्नोत्तरांचा एक मजेदार रॅपिड फायर राऊण्ड झाला. मात्र यामध्ये त्यांना चुकीची उत्तर द्यायची अशीच अट घालण्यात आली होती. होस्टने विराटला तुमचं नाव काय असं विचारलं असता त्याने, 'गजोधर' असं उत्तर दिलं. 

9/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

त्यानंतर अनुष्काला तुम्ही तुमच्या पतीचा क्रमांक कोणत्या नावाने सेव्ह केला आहे असा प्रश्न विचारला. त्यावर अनुष्काने हसत हसत 'पती परमेश्वर' असं उत्तर दिलं. यानंतर अनुष्काने हसतच, "ओजी और सुनिए जी" असंही म्हटलं.

10/10

Virat Kohli Phone Number Anushka Sharma

यानंतर विराटला हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विराटने, "डार्लिंग" असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाल्याचं पहायला मिळालं. एका पॉजनंतर आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर विराटने, "अरे हे चुकीचं उत्तर आहे मित्रांनो! खरं उत्तर मी तुम्हाला इथं सांगणार नाही," असं म्हणताच सर्वजण हसू लागले. अनुष्कालाही तिचं हसू थांबवता आलं नाही.