'या' मुलीचं Handwriting कॉम्प्युटर टायपिंगपेक्षा सर्वात सुंदर, पाहून तुम्हाला पडेल भुरळ

World Beautiful Handwriting : या विद्यार्थिनीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तेही तिच्या हस्ताक्षराने...या मुलीचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की, कॉम्प्युटर टायपिंगही त्यासमोर फिकी पडेल. 

Nov 04, 2023, 12:51 PM IST
1/8

विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनात हस्ताक्षर हे अभ्यासाइतकंच महत्त्वाचं असतं. कारण हस्ताक्षर सुंदर असेल तर ते सर्वांचं लक्ष वेधून तर घेतेचं शिवाय चांगल्या मार्क मिळवण्याचं हे उत्तम साधन असतं. आजही शाळांमध्ये शिक्षकांकडून हस्ताक्षरावर भर दिला जातो. 

2/8

या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल आणि पेनचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. पण शालेय जीवनात फक्त त्याचा वापर होतो. त्यानंतर फक्त स्वाक्षरी करण्यापूर्ती पेनचा वापर होतो. डॉक्टरांचे हस्ताक्षर तर जगात सर्वात खराब म्हणून प्रसिद्ध असतात.   

3/8

पण या डिजिटल युगात एक मुलगी आहे, जिथे हस्ताक्षर जगातील सर्वोत्तम सुंदर हस्तलेखन आहे. नेपाळमधील एका शाळकरी मुलीने हा मान मिळवला आहे. त्यांचं हस्ताक्षर जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर आहे. 

4/8

या मुलीचं नाव आहे प्रकृती मल्ला (Prakriti Malla). आज प्रकृती 16 वर्षांची झाली असून तिने नेपाळमधील सैनिक निवासी महाविद्यालयात 10वीचं शिक्षण घेतलंय. पण या मुलीच्या हस्ताक्षराने सर्व जगाला भुरळ पाडली आहे. 

5/8

प्रकृती मल्लाने लिहिलेली पाने आज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.2022 मध्ये नेपाळमधील संयुक्त अरब अमिराती (UAE) दूतावासाने प्रकृतीला एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, संयुक्त अरब अमिरातीच्या 51 व्या स्पिरिट ऑफ द युनियनच्या निमित्ताने प्रकृतीला जागतिक उत्कृष्ट हस्तलेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आहे. 

6/8

प्रकृती ही खूप होतकरू विद्यार्थिनी असून तिची हस्तलेखनाची शैली देखील खूप वेगळी आहे. ती जेव्हा कागदावर लिहिते तेव्हा असं वाटतं जसं की, कॉम्प्युटर टायप केलं आहे. खरं तर कॉम्प्युटर टायपिंगपेक्षा सुंदर तिचं हस्ताक्षर आहे.

7/8

तिचं हस्ताक्षर पाहून तज्ज्ञांनाही आश्चर्य व्यक्त करतात. तज्ज्ञ म्हणतात की निसर्गाच्या हस्ताक्षरात प्रत्येक अक्षरातील अंतर समान असतं. म्हणूनच ते इतकं सुंदर दिसतं की फक्त नेपाळमध्येच नाही तर संपूर्ण जगात ती सर्वोत्कृष्ट आहे. तेवढंच नाही तर अनेक जणांनी तिच्या हस्ताक्षराची तुलना ही कॅलिग्राफीशी केली आहे.

8/8

प्रकृतीला उत्कृष्ट हस्ताक्षरासाठी नेपाळ सशस्त्र दलाकडून पुरस्कारही मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये प्रत्येक अक्षर अतिशय काळजीपूर्वक आणि सुंदर लिहिलेलं दिसतं होतं.