वरुण धवनचा इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स पाहून पत्नीला येतो संशय? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून पत्नी नताशाला संशय येतो का? यावर अभिनेता वरुण धवनचा मोठा खुलासा. म्हणाला, 'तिला माहिती....',   

| Dec 26, 2024, 16:35 PM IST
1/7

'बेबी जॉन'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा चित्रपट 'बेबी जॉन' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरुणची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

2/7

फॅमिली मॅन

वरुण अभिनेता असण्यासोबतच एक फॅमिली मॅन देखील आहे. अभिनेत्याने नताशा दलाल सोबत लग्न केलं आहे. त्यांना एक गोंडस मुली आहे.

3/7

लव्ह मॅरेज

वरुण आणि नताशा यांचे लव्ह मॅरेज आहे. दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक होण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच कारणांमुळे, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याला नताशा कधी संशय घेते का? असा प्रश्न विचारण्यात आला. 

4/7

वरुणचे उत्तर

या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, नताशाला माहिती आहे मी कसा आहे. ती मला पूर्णपणे ओळखते. तिला माहितीये हा घरीच येणार आहे. मी देखील तसाच आहे. 

5/7

शंका

मला असे कोणतेही छंद नाहीत. मी लोकांशी छान बोलेन, त्यांच्याशी मस्ती, गप्पा मारेन. याशिवाय मला इतर कोणत्याही गोष्टींमध्ये रस नाहीये.  नताशाला कधीही माझ्याबद्दल संशय वाटत नाही. 

6/7

वैवाहिक जीवन

लग्नानंतर तुम्ही खोटं बोलू शकत नाही की तुम्ही इतर कोणालाही दिसत नाही. मी नताशासोबत या सर्व गोष्टींवर चर्चा करतो. त्याच्याकडे सुखी वैवाहिक जीवनाचे सूत्र नाही. 

7/7

फॅशन डिझायनर

वरूण धवन हा स्वत: पेक्षा जास्त प्रेम नताशावर करतो. नताशा माझ्यापेक्षा चांगली आहे. नताशाचा चित्रपट कुटुंबाशी संबंध नाही. ती एक फॅशन डिझायनर आहे.