बेडरुमबद्दल मेलेनिया ट्रम्प यांची विचित्र मागणी; White House मध्ये शिफ्ट होण्याआधीच राडा

Melania Trump Demand About Bedroom In White House: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार असतानाच आता त्यांच्या पत्नीनं केलेल्या मागणीचीही चर्चा आहे. नेमकं काय म्हटलं आहे मेलेनिया यांनी पाहूयात...

Swapnil Ghangale | Nov 29, 2024, 11:33 AM IST
1/14

melaniatrump

अमेरिकी राष्ट्रध्यक्षांच्या पत्नीची मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकी ही काय मागणी आहे आणि या दोघांमधील नातं कसं आहे पाहूयात...

2/14

melaniatrump

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून जवळपास महिना होत आला आहे. पुढील दोन महिन्यांहून कमी कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसचा ताबा येईल.

3/14

melaniatrump

एकीकडे ट्रम्प यांनी आपल्या स्तरावर नव्या नियुक्त्या आणि इतर कारभार हळूहळू हातात घ्यायला सुरुवात केली असतानाच त्यांच्या निकटवर्तीयांनीही पुन्हा राष्ट्राध्यक्षांचे नातेवाईक म्हणून मिळणाऱ्या सोयी सुविधांसंदर्भात काय, कसं, कुठे हवं आहे याबद्दलची तयारी हळूहळू सुरु केल्याचं दिसत आहे.  

4/14

melaniatrump

अशातच डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांचं पतीबरोबरचा 36 चा आकडा हा जगजाहीर आहे. यापूर्वी ट्रम्प पहिल्या टर्ममध्ये राष्ट्राध्यक्ष असताना दोघांचे एकमेकांवर राग व्यक्त करणारे एकमेकांकडे कुत्सित नजरेनं पाहाणारे अनेक फोटो चर्चेत आले होते. 

5/14

melaniatrump

खरं तर मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं अजिबात पटत नाही अशी चर्चा अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. याच कारणामुळे आता ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये व्हाइट हाऊसमध्ये राहायला जाण्याआधी मेलेनिया यांनी व्हाइट हाऊसमधील बेडरुमबद्दल विचित्र मागणी केली आहे. ही मागणी काय आहे ते पाहूयात मात्र त्यापूर्वी ट्रम्प आणि मेलेनिया यांचं नातं आणि भविष्यातील नियोजन काय आहे ते जाणून घेऊयात...

6/14

melaniatrump

एकेकाळची सुपर मॉडेल अशी ओळख असलेल्या मेलेनिया यांचा जन्म स्लोव्हेनिया देशातील असून त्यांनी 2006 साली अमेरिकी नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्या आता ट्रम्प यांची पत्नी म्हणून न्यू यॉर्क शहर आणि फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या पाम बिच येथील घरात वास्तव्यास असतील असं सांगण्यात आलं आहे.

7/14

melaniatrump

मेलेनिया यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून बॅरॉन नावाचा एकमेव मुलगा असून तो 18 वर्षांचा आहे. तो न्यू यॉर्क विद्यापीठामध्ये शिकतो. पाम बिचमधील घर हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठीचं आलिशान घर असून त्याला मार-ए-लागो नावाने ओळखलं जातं.

8/14

melaniatrump

डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 रोजी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. पतीच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये मेलेनिया बराचसा काळ फ्लोरिडामधील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी वास्तव्यास असतील अशी माहिती 'सीएनएन'ने दिली आहे. 

9/14

melaniatrump

फ्लोरिडामधील निवासस्थानी राहण्याचा निर्णय मेलेनिया यांनी त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यानंतर घेतल्याचं वृत्त आहे. मात्र व्हाइट हाऊसमध्ये राहतानाही मेलेनिया यांनी बेडरुममध्ये फारच विचित्र मागणी केली आहे. 

10/14

melaniatrump

'इनसायडर'ने दिलेल्या वृत्तानुसार मेलेनिया यांनी व्हाइट हाऊसमध्ये दोन वेगवेगळे बेडरुम असावेत अशी मागणी केली आहे.

11/14

melaniatrump

मेलेनिया यांनी आपण आपला बेडरुम डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शेअर करणार नसल्याचं सांगितलं असून आपल्याला वेगळा स्वतंत्र बेडरुम दिला जावा अशी मागणी केली आहे.

12/14

melaniatrump

"डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊसमधील मास्टर सूटमध्ये राहतात. तर ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मेलेनिया व्हाइट हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन रुमच्या सूटमध्ये वास्तव्यास होत्या. ते आता पुन्हा अशाच प्रकारे व्हाइट हाऊसमध्ये राहणार आहेत," असं सूत्रांनी सांगितलं आहे.  

13/14

melaniatrump

22 जानेवारी 2025 रोजी मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत.

14/14

melaniatrump

मेलेनिया पतीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या या दुसऱ्या टर्ममध्ये पूर्णवेळ त्यांच्यासोबत न्यू यॉर्कमध्ये राहणार नसून कधीतरीच व्हाइट हाऊसमध्ये वास्तव्यास असतील. तरीही त्यांना वेगळा बेडरुम हवा आहे.