"भाजप हा भरकटलेला पक्ष".. बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका
Uddhav Thackeray on Chandrakant Patil : अयोध्येत शिवसेना, बाळासाहेब ठाकरे गेले होते का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहेत त्यांनी अडवाणींची मुलाखत ऐकावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
1/6

चंद्रकातं पाटील बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत. ज्यावेळी बाबरी पडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळामध्ये लपले आहे. पंतप्रधान सुद्धा बांगलादेशच्या सत्याग्रहात सहभागी होते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदर सिंह भंडारी यांनी आपल्या काही अंगलंट यायला नको म्हणून त्यांनी जाहीर केले होते की बाबरी पाडण्यात भाजप नव्हे तर शिवसेना होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
2/6

ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी हजर होतो बाळासाहेबांना फोनवरुन बाबरी पाडण्याची माहिती दिली. त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असे म्हटले होते. आता सगळे जण बिळातून बाहेर येत आहेत. इतके गप्प का होतात? मला आता भीती वाटत आहे की, मुघलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचाही इतिहास पुसरणार आहेत की काय?
3/6

भाजपकडे कधीही शौर्य नव्हते. बाबरी पाडली तेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. तेव्हा मुंबई शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी वाचवली. गुजरात अहमदाबादमध्ये जे घडलं त्यात पोलिसांचा वापर केला गेला. मुंबई पोलीस आणि लष्कर शिवसैनिकांना मारत होते. काही दर्ग्यांचे रक्षणसुद्धा शिवसैनिकांनी केले आहे.
4/6

5/6
Uddhav Thackeray

6/6
Uddhav Thackeray
