या मालिकेतील जोडी अडकणार लग्नबेडीत

Dakshata Thasale | Dec 06, 2018, 15:50 PM IST
1/5

झी युवा वाहिनीने नुकताच 'तू अशी जवळी राहा' हा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला.  ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची आणि म्हणूनचया मालिकेचं कथानक प्रेक्षकांना भावलं. या मालिकेत राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

2/5

मनवा तिच्या लग्नात मराठमोळ्या पेशवाई लुकमध्ये दिसणार आहे. नववारी साडी, नथ, पेशवाई दागिने आणि मुंडावळ्या यामध्ये मानवच सौंदर्यअगदी खुलून दिसणार आहे. मालिकेतील कलाकारांचं बॉण्डिंग इतकं चांगलं आहे की लग्न सोहळ्याचे चित्रीकरण चालू असताना मनवाचे कुटुंबीय खरोखर भावुक झाले. 

3/5

हा लग्न सोहळा अगदी दिमाखदार असणार आहे. दोन्ही परिवार एकत्र येऊन राजवीर आणि मनवा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा दिवस खास बनवणार आहेत. लग्न सोहळा हा अगदी रीतसर असूनहळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. 

4/5

"या लग्नसोहळ्यातील एक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली ती म्हणजे 'कन्यादान' या गोष्टी मागचा मनवाच्या वडिलांचा विचार. मनवाचे वडील मनवाचं कन्यादान करण्यासाठी नकार देतात कारण त्यांच्या मते मुलगी ही कुठली वस्तू नाही आहे जी कोणी दानकरावी. जरी राजवीरशी मनवाचं लग्न झालं तरीही मनवा ही शेवट पर्यंत त्यांची मुलगीच राहणार आहे. हा विचार माझ्या मनाला खूप भिडला. कदाचित हा विचार प्रेक्षकांची विचारसरणी देखील बदलू शकेल."

5/5

हा लग्न सोहळा साजरा करायला पाहायला विसरू नका 'तू अशी जवळी राहा' मालिकेचा १ तासाचा विशेष भाग ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता फक्त झी युवावर.