'या' सेलिब्रिटींनी केलं कमी खर्चात लग्न? खरंच कंजूस आहेत का 'हे' सेलिब्रिटी...

सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्राचं लग्न. बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक लग्न झाले, त्यांच्यातील अनेक लग्न ही बॉलिवूडमध्ये गाजलेली आणि ट्रेन्ड सेटर होती. पण त्यातही काही लग्न आहेत जी खूप मिनिमल खर्चात झाली होती. त्यांनी कमी खर्चात लग्न केलं. त्यापैकी काही आहेत ज्यांनी तर मंदिरात लग्न केली. त्यापैकी एक असं नाव आहे जे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. चला तर जाणून घेऊया बॉलिवूडमधील त्या सेलिब्रिटींची लग्न ज्यांनी मंदिरात गुपचूप केलं. 

Diksha Patil | Sep 24, 2023, 18:49 PM IST
1/7

परेश रावल

celebswhogotmarriedintemple

परेश रावल यांनी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन स्वरूप संपतनुसार लग्न केलं. 1987 मध्ये दोघांनी लग्न केल. परेश रावल आणि स्वरुपच्या लग्नाला 36 वर्ष झाली. ते दोघे आनंदी आहेत. त्यांना दोन मुलं असून त्यांची नावं आदित्य आणि अनिरुद्ध आहेत. 

2/7

संजय दत्त

celebswhogotmarriedintemple

संजय दत्तनं रिया पिल्लेसोबत मंदिरात खूप साधारण लग्न केलं. हे त्यांचं दुसरं लग्न होतं. आजही लोकांना या गोष्टीवर विश्वास होत नाही. संजय दत्त आणि रिया पिल्लैच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 

3/7

श्रीदेवी

celebswhogotmarriedintemple

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी देखील खूप साध्या पद्धतीनं लग्न केलं. श्रीदेवी यांनी दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत मंदिरात लग्न केलं. 

4/7

ईशा देओल

celebswhogotmarriedintemple

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक बेटी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी जुहूमध्ये असलेल्या इस्कॉन मंदिरात लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र आणि हेमा यांनी खूप जास्त पैसे खर्च केले नव्हते.   

5/7

भूषण कुमार

celebswhogotmarriedintemple

गुलशन कुमार यांच्या मुलानं म्हणजेच टी-सीरज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी खूप साध्या पद्धतीनं लग्न केलं. त्यांनी वैष्णो देवी मंदिरात दिव्या खोसलासोबत लग्न केलं. 

6/7

रेणुका शहाणे

celebswhogotmarriedintemple

'हम आपके हैं कौन' या चित्रपटात अभिनय करणाऱ्या रेणुका शहाणे आणि अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न केलं. त्यांचं लग्न खूप साधारण पद्धतीनं झालं. 

7/7

अमृता राव

celebswhogotmarriedintemple

अमृता रावनं खूप साध्या पद्धतीनं आरजे अनमोलसोबत लग्न केलं होतं. त्याच्या लग्नाच्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नाविषयी कळल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. (All Photo Credit : Social Media)