एकावेळी 25 समोसे खातो 'हा' बॉलिवूड अभिनेता; फिटनेस पाहून होणार नाही विश्वास

बॉलिवूडमध्ये करिअर करणारा प्रत्येक सेलिब्रिटीचं एक खास टॅलेन्ट असतं किंवा त्यांच्यात ते स्किल्स असतात. त्यामुळे ते या क्षेत्रात येऊ शकले असं अनेकदा म्हटलं जातं. पण अभिनय किंवा डान्स शिवाय त्यांच्याकडे काही वेगळं टॅलेन्ट असतं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना नेमकं आपण कशाविषयी जाणून घेणार आहोत. तर आज आपण अशा एका अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्यानं त्याच्याकडे असलेलं एक हटके टॅलेन्ट सांगितलं आहे. 

| Sep 01, 2024, 13:18 PM IST
1/7

या अभिनेत्यानं त्याच्या अशा टॅलेन्ट विषयी सांगितलं जे ऐकूण कोणालाही तो त्याचा फिटनेस कसा मेन्टेन ठेवतो यावर विश्वास होणार नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता आणि त्याचं असं काय टॅलेन्ट आहे. 

2/7

अभिनय क्षेत्रात असलेले सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेसला घेऊन सतत चर्चेत असतात. ते त्यासाठी स्वत: ची खूप जास्त काळजी घेतात. त्यांच्या खाण्या-पिण्यावर देखील ते कंट्रोल करतात. आज आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत. त्या अभिनेत्याविषयी बोलणार आहोत ज्याची बॉडी आणि फिटनेस पाहिल्यानंतर कोणी यावर विश्वास करणार नाही की तो एकावेळी 25 समोसे खातो. 

3/7

हा बॉलिवूड अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हॅन्डसम हंक हृतिक रोशन आहे. हृतिकनं झूमला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की त्याला समोसा खायला खूप आवडतं. 

4/7

हृतिक त्याच्या टोन्ड बॉडीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की हृतिकला समोसा इतका आवडतो की एकावेळी तो 25 समोसे खाऊ शकतो. याविषयी सांगत हृतिक म्हणाला की चित्रपट पाहत असताना तो चार समोस्यांपासून सुरुवात करतो, पण मग त्यानंतर तो मोजत नाही. या आधी देखील हृतिकनं त्याला समोसा किती आवडतो याचा खुलासा काबिल या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी केला होता. 

5/7

एकावेळी किती समोसे खाऊ शकतो असा प्रश्न विचारताच हृतिक म्हणाला, 'तो एकावेळी 25 समोसे खाऊ शकतो. हृतिकनं सांगितलं की तो चित्रपट पाहतो, तेव्हा 4 समोस्यांपासून सुरुवात करतो. ज्यात प्रत्येत समोस्याचे दोन भाग असतात. तर त्यामुळे 8 समोसे होतात. हे ऐकून त्याची सहकलाकार यामी गौतमला देखील आश्चर्य होतं.' 

6/7

पुढे हृतिकला विचारण्यात आलं की 'मग सगळे समोसे जातात कुठे? तर हृतिक रोशन मस्करी करत म्हणाला, माझ्या पोटात. हे ऐकल्यानंतर यामी हसते आणि बोलते की मला माझे आधीचे दिवस आठवले.' 

7/7

दरम्यान, हृतिकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'फायटर' या चित्रपटात दिसला हता. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला. त्यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता तो लवकरच 'वॉर 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. तर यात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.