Bad Habbits तुम्हाला मृत्यूजवळ नेण्याची शक्यता?

Jul 19, 2021, 14:58 PM IST
1/5

फिटनेसकडे लक्ष द्या

फिटनेसकडे लक्ष द्या

शरीराकरता व्यायाम हा अत्यंत महत्वाा आहे. हृदयाशी संदर्भात असलेले प्रश्न कमी करण्यासाठी व्यायाम अतिशय महत्वाचं आहे. दररोज व्यायाम केल्याने हाय ब्लर्ड प्रेसन 75 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. दररोज व्यायाम केल्याने हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. शरीरात ब्लड शूगर लेवल आणि इंसुलिन लेवल देखील कंट्रोलमध्ये राहते. एक्सरसाइज टाइप टू डायबिटिज देखील कंट्रोल केला जाऊ शकतो. 

2/5

सिगरेट-दारूपासून दूर राहा

सिगरेट-दारूपासून दूर राहा

कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरस सर्वाधिक त्या लोकांना त्रास देतो. जे व्यसानाधिन आहेत. जे लोकं सर्वाधिक सिगरेट आणि दारू पितात त्यांना याचा त्रास अधिक होतो. या लोकांची इम्युनिटी इतरांच्या तुलनेत कमी असते. यांच्या लीवरवर देखील याचा त्रास होतो. यामुळे कॅन्सरसारखा त्रास देखील होऊ शकतो. 

3/5

पेन किललपासून लांब राहा

पेन किललपासून लांब राहा

पेन किलर म्हणजे शरीराला होणारा त्रास कमी करणारी औषधे. ही औषधे डॉक्टराच्या सल्ल्यानुसार घेऊ नये. या औषधांचं अधिक सेवन केल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. या औषधांची लागलेली सवय ही अतिशय घातक असते. पेन किलर मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे  अल्सर, गैस्ट्रोइंटसटाइनलमधून रक्त, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा त्रास वाढू शकतो. 

4/5

जंक फूडपासून दूर राहा

जंक फूडपासून दूर राहा

जंक फूडचा अति वापर हे तुमच्या शरीरात अनक समस्या निर्माण करतात. कार्बोडायड्रेट आणि सुगर यांचा वापर वाढल्यामुळे जाडेपणा आणि हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. जाडेपणा शरीरातील धमण्यांमध्ये अडथळा निर्माण करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मैदा ब्रेड आणि दो मिनिटांत तयार होणारे न्यूडल्स याचा वापर टाळा. शरीरासाठी या गोष्टी अतिशय घातक आहेत. 

5/5

सकाळी लवकर उठणे महत्वाचे

सकाळी लवकर उठणे महत्वाचे

जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर तुमच्या शरीरात जास्त एनर्जी असते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचा दिनक्रम लवकर सुरू होतो. यामुळे सकाळी लवकर उठल्यावर व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असते. व्यायामामुळे शरीरात विटामिन डी निर्माण होते.