तुमची इच्छा असूनही पाहता येणार नाहीत रेखा यांचे 'हे' पाच चित्रपट
चित्रपट वर्तुळात यशाच्या शिखरावर पोहोचण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. अशा कलाकारंच्या कारकिर्दीमध्ये असेही काही टप्पे येतात जेव्हा चित्रपटांचे प्रस्ताव येऊन त्यासाठीचं चित्रीकरण वगैरेही सुरु होतं. पण, काही कारणास्तव चित्रपट पूर्णत्वास जात नाहीत. गेले तरी काही बाबतीतत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेखा यांच्याही कारकिर्दीत असे काही चित्रपट आले, जे पाहण्याची चाहत्यांची कितीही इच्छा असली तरीही ते शक्य नाही.
चित्रपट वर्तुळात यशाच्या शिखरावर पोहोचण्याची अनेक कलाकारांची इच्छा असते. अशा कलाकारंच्या कारकिर्दीमध्ये असेही काही टप्पे येतात जेव्हा चित्रपटांचे प्रस्ताव येऊन त्यासाठीचं चित्रीकरण वगैरेही सुरु होतं. पण, काही कारणास्तव चित्रपट पूर्णत्वास जात नाहीत. गेले तरी काही बाबतीतत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेखा यांच्याही कारकिर्दीत असे काही चित्रपट आले, जे पाहण्याची चाहत्यांची कितीही इच्छा असली तरीही ते शक्य नाही.
सोने की चिडीया....

इस्मत चुगताई यांनीच कथा लिहित निर्मिती केलेला एक चित्रपट होता, 'सोने की चिडीया'. तत्कालिन आघाडीची अभिनेत्री नर्गिस आणि त्यांचं त्यांच्या भावांसोबतचं नातं हा कथानकाचा मूळ गाभा होता. त्या वेळी 'श्री 420', 'आवारा' आणि 'मदर इंडिया' या चित्रपटांमुळे प्रेक्षकांना नर्गिस यांच्या लोप्रियतेचा अंदाज होता. त्यांना या चित्रपटाचा प्रस्तावही देण्यात आला, पण जेव्हा नर्गिस यांची ही कहाणी त्यांना समजली तेव्हा ही कोणा एका अभिनेत्रीचीच कथा असू शकते, थोडक्यात एका अभिनेत्रीला कशा प्रकारे तिचे कुटुंबीय अर्थार्जनाच्याच दृष्टीनं गृहित धरतात ही बाब त्यांच्या लक्षात आली. असं म्हटलं जातं की याचमुळं रेखा यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला. पुढं हा चित्रपटच बंद झाला.
महेश भट्ट यांच्यासोबतचा 'हंसनी'

अनेकदा आयुष्यातील काही खऱ्या प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या कथानकांचा आधार घेत चित्रपट साकारण्याकडे महेश भट्ट यांचा कल. अशातच त्यांनी जेव्हा रेखा यांच्यापुढं 'हंसनी' या चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांना नकार देता आला नाही. पण, या चित्रपटाच्या माध्यमातून रेखा यांचं पडद्यावरील आणि पडद्यामागील आयुष्य नेमकं आहे तरी कसं यावरुन त्यांना पडडदा उचलायचा होता. ती एका अशा अभिनेत्रीची कथा होती, जी आता उतारवयात आहे. चित्रपटाच्या निमित्तानं कोणी आपल्या खासगी आयुष्याबाबत चर्चा करावी ही बाब मात्र रेखा यांना पटली नाही. त्यामुळं १९९४ मध्ये हा चित्रपट बंद झाला.
राकेश रोशन यांच्या सोबतचा 'चोली दामन'

रेखा यांच्याप्रती आदराची भावना व्यक्त करणाऱ्या कलाकारांमध्ये राकेश रोशन यांच्याही नावाचा समावेश होतो. या दोन्ही कलाकारांचा सहभाग असणारा एक रोमँटीक चित्रपट रुपा सेन यांनी साकारला होता. 'चोली दामन' असं त्या चित्रपटाचं नाव. योगिता बाली आणि आयएस जौहर हेसुद्धा या चित्रपटाचा एक भाग होते. पण, आर्थिक चणचणीमुळं १९७५ मध्ये हा चित्रपट आवरता घ्यावा लागला.
नसिरुद्दीन शाह यांच्यासोबतचा 'फाईव्ह स्टार हॉटेल'

सईद मिर्झा यांनी हा चित्रपट साकारण्याचा निर्णय़ घेतला होता. १९८२ मध्ये कास्टींग पूर्ण झाल्यानंतर चित्रीकरणाची तयारीही सुरु झाली. रेखा, नसिरुद्दीन शाह, अमजद खान, शबाना आझमी आणि स्मिता पाटील अशा कलाकारांची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. तीन मोठ्या अभिनेत्री, त्यात नसिरुद्दीन शाह यांसारखा अग्रगणी अभिनेता अशी एकंदर स्टारकास्ट पाहता हा चित्रपट सुरुवातीलाच अनेकांच्या पचनी पडला नाही.
सलीम - जावेद यांचा चित्रपटही मार्गी लागलाच नाही...
