डायबेटिजच्या रुग्णांनी संध्याकाळी खावा 4 हेल्दी स्नॅक्स, नाही वाढणार ब्लड शुगर

दुपारी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान भूक लागल्यावर स्नॅक्स खाण्याची क्रेविंग होत असते. सामान्यपणे स्नॅक्स म्हणून लोक वेफर्स,फरसाण इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन करतात. पण डायबेटिजच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.   

Pooja Pawar | Oct 12, 2024, 16:34 PM IST
1/6

डायबेटिज असलेल्या रुग्णांनी असे स्नॅक्स खावे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल आणि त्यामुळे डायबेटिज वाढणार नाही. तेव्हा असे कोणते स्नॅक्स आहेत जे डायबेटिज रुग्ण देखील बिनदिक्कतपणे खाऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

2/6

काळे चणे :

आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की काळे चणे हे डायबेटिज रुग्णांसाठी चांगला स्नॅक्स आहे. काळ्या चनांमध्ये सर्विंग फायबर असतात. तुम्ही काळ्या चण्यांमध्ये लिंबू, टोमॅटो, चाट मसाला टाकून खाऊ शकता.  तसेच भाजलेले काळे चणे खाणे सुद्धा चांगला पर्याय आहे.   

3/6

पॉपकॉर्न :

पॉपकॉर्न हा झटपट तयार होणारा स्नॅक्स आहे. पॉपकॉर्नच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते. पॉपकॉर्नमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. चित्रपटगृहांमध्ये मिळणारे पॉपकॉर्न खाणे टाळा कारण त्यांच्यात मीठ जास्त असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. संध्याकाळच्या वेळेला पॉपकॉर्न हा एक चांगला स्नॅक्स ऑप्शन आहे. 

4/6

बदाम :

बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि अन्य पोषकतत्व असतात. डायबेटिजमध्ये हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो, अशावेळी डायबेटीजचे रुग्ण स्नॅक्स म्हणून आहारात बदामाचा समावेश करू शकतात. बदामामुळे डायबेटिज कंट्रोलमध्ये राहते. सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम खाणे जास्त फायदेशीर ठरते.   

5/6

अंड :

अंड हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी अंड्याच्या सेवनाने मदत होते. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये डायबेटीजचे रुग्ण अंड्यांचे सेवन करू शकतात, कारण यामुळे डायबेटिज वाढत नाही आणि हाड देखील मजबूत राहतात. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)