धमाकेदार! The Kerala Story चित्रपटानं तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

The Kerala Story Box Office Collection Day 3 : 'द केरला स्टोरी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तर इतकं असून या सगळ्याचा बॉक्स ऑफिसवर किती परिणाम झाला आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याच्या उलट झालं आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटातील कलेक्शन विषयी विचारायचं झालं तर त्याच्या सुरुवातीचे सगळे आकडे समोर आले आहे. पण रविवारी चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे. 

Diksha Patil | May 08, 2023, 13:17 PM IST
1/7

तिसऱ्या दिवशी किती केली कमाई

TheKeralaStoryCollectionDay3

वेबसाईट sacnilk नं दिलेल्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 16.50 कोटींची कमाई केली आहे. 

2/7

दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

TheKeralaStoryCollectionDay3

दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीनं बॉक्स ऑफसवर 10.5 कोटींची कमाई केली आहे. 

3/7

पहिल्या दिवशी इतकी कमाई

TheKeralaStoryCollectionDay3

पहिल्या दिवशी चित्रपच प्रदर्शित होताच 8 कोटींची कमाई केली. वादाच्या भोवऱ्यात असून चित्रपटानं इतकी कमाई केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

4/7

तीन दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

TheKeralaStoryCollectionDay3

'द केरला स्टोरी'नं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर 35 कोटींची कमाई केली. चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अजूनही अडकला आहे. तरी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याची पसंती देत आहेत.   

5/7

'द केरला स्टोरीचा काय आहे वाद

TheKeralaStoryCollectionDay3

'द केरला स्टोरी' या चित्रपटात 32 हजार नाही तर 4 मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर आयएसआयएसमध्ये भरती करण्याचा त्यांचा संपूर्ण प्रवास आणि त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना केला ते दाखवण्यात आले आहे. 

6/7

चित्रपटातील इतके सीन काढण्याचा सेन्सॉरनं दिला होता सल्ला

TheKeralaStoryCollectionDay3

'द केरला स्टोरी' या चित्रपटातील 10 सीन्सवर सेन्सॉरनं कात्री चालवली आहे. अनेकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यानं छाप सोडल्याचे म्हटले आहे. 

7/7

दिग्दर्शन आणि कलाकार

TheKeralaStoryCollectionDay3

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धि इडनानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (All Photo Credit : Trailer screen Grab/ social media)