अयोध्येच्या 'या' हनुमान मंदिराशिवाय राम मंदिराची यात्रा अपूर्ण, जाणून घ्या हनुमानगढीचं रहस्य

Hanuman Garhi Mandir : राम नगरी अयोध्येतील हनुमान गढी मंदिर खूप प्रसिद्ध असून राम मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. या मंदिरात हनुमानाचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून दूरदूरन लोक दर्शनासाठी येणार. 

Jan 21, 2024, 13:19 PM IST
1/7

राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या उत्साह संपन्न होणार आहे. अयोध्या नगरी आपल्या रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. देशविदेशातून रामभक्त हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.  

2/7

पण रामलल्लाचं दर्शना आधी अयोध्येतील या हनुमान मंदिराचं दर्शन महत्त्वाच आहे. अयोध्येतील हे सर्वात प्रसिद्ध पवनपुत्र बजरंगबलीचं मंदिर आहे. या मंदिराचं नाव हनुमानगढी असं आहे.   

3/7

जेव्हा लंकेतून परतल्यानंतर भगवान रामाने आपले प्रिय भक्त हनुमान यांना राहण्यासाठी हे स्थान दिलं होतं, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या मंदिराला अतिशय महत्त्व आहे. 

4/7

अयोध्या शहराच्या मध्यभागी बांधलेले हनुमानजींचं हे मंदिर शाही दरवाज्यासमोर एका उंच टेकडीवर वसलेले आहे.   

5/7

या मंदिराची स्थापना 300 वर्षांपूर्वी स्वामी अभयरामदासजींच्या सूचनेनुसार सिराज-उद-दौला यांनी केली होती असं म्हणतात. हनुमानगढीच्या दक्षिणेला सुग्रीव टिळा आणि अंगद टिळा आहेत. 

6/7

आजही हनुमानजी भगवान रामाच्या आज्ञेनुसार अयोध्येची जबाबदारी सांभाळतात असं म्हटलं जातं. हे मंदिर अयोध्येच्या सरयू नदीच्या उजव्या तीरावर उंच डोंगरावर असल्याने मंदिरा 77 पायऱ्या आहेत. 

7/7

या मंदिराच्या सर्व भिंतींवर हनुमान चालीसा आणि चौपैया लिहिलेल्या आपण्यास पाहिला मिळतात. हनुमान गढीतील हनुमानजींची मूर्ती दक्षिणेकडे आहे.  तर हनुमानजींना लाल वस्त्र अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)