आषाढी एकादशीचा उत्साह; पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

भेटीलागी जीवा लागलीसे आस ही एकच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची इच्छा मनात ठेवून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. दशमीच्या रात्री सगळ्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. 

Jun 29, 2023, 00:08 AM IST

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचं शिखर, रुक्मिणी माता मंदिराच शिखर, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम भवन, यासह संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. 

1/7

पंढरपूरात आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी जमले आहेत. 

2/7

आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेचं पात्र भाविकांनी फुलून गेलं आहे. 

3/7

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारक-यांनी गर्दी गर्दी केलीये.. कोणतीही अनुचीत घटना घडूनये यासाठी मंदिर परिसरात बॉम्ब शोध आणि निकामी पथक तैनात करण्यात आलं आहे. 

4/7

आषाढी एकादशीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. 

5/7

संपूर्ण पंढरी विठुनामाच्या गजरात न्हाऊन निघाली आहे. 

6/7

आषाढी एकादशी निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाचं हे सगळे वारकरी दर्शन घेतील. 

7/7

सोपान काका, तुकोबांची पालखी, तसंच एकनाथ महाराजांची पालखी आणि इतरही पालख्या पंढरीत पोहोचल्या आहेत.