मोबाईल साफ करताना तो कुठेही पुसता, तर मग थांबा; चुकूनही करु नका 'हे' काम

तुम्ही तुमच्या इतर गॅजेटप्रमाणे मोबाईचीही तितकीच काळजी घेतली जाते. मोबाईलमध्ये काही असे भाग असतात जे तुम्हाला साफ करता येत नाही. मात्र तुम्ही तो भाग साफ करण्याच्या प्रयत्नात असं काही करुन बसता की त्याचा मोठा फटका बसू शकतो.

Jan 05, 2023, 18:17 PM IST
1/5

phone

मोबाईलचा कॅमेरा साफ करताना त्याच्या कोपऱ्यातील घाण काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही तीक्ष्ण वस्तू वापरता. मात्र यावेळी तुमच्या कॅमेराची लेन्स खराब होऊ शकते.  

2/5

smartphone

स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेराही हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असल्याने हा भाग जास्त साफ केला जातो. मात्र यामुळे कॅमेऱ्याचा दर्जा बिघडतो.

3/5

phone1

तुमच्या फोनमधील व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटणही साफ करण्याचा प्रयत्न करात असाल तर थांबा. सर्वात जास्त वापर असलेल्या या बटणांची योग्य निगा राखणं आवश्यक आहे. त्यामुळे ते साफ करताना योग्य काळजी घ्या.

4/5

phone

यानंतर येतो चार्जिंग पॉईंटचा भाग. जर चार्जिंग पॉईंटमधील घाण साफ करण्याच्या नादात तुम्ही काही जास्त टोकदार वस्तू वापरली तर नक्कीच नुकसान होऊ शकते.

5/5

smartphone

यासोबतच तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले साफ तुम्ही करताना सर्रासपणे तुमच्या अंगावरील कपड्यांना तो पुसता. मात्र यामुळे डिस्प्ले खराब होऊ शकतो. त्यामुळे डिस्प्ले साफ कोणतेही कापड वापरू नका. साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. कारण या कपड्याने डिस्प्लेला कोणतेही नुकसान होत नाही.