Team India Victory Parade: टीम इंडियाचे 'या' 4 मुंबईकर खेळाडूंचा विधानसभेत होणार सन्मान

Team India Victory Parade: टीम इंडियाचं टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसह भारतात आगामन झालं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अशातच आता राज्याच्या विधानसभेत देखील चार खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. 

Saurabh Talekar | Jul 04, 2024, 18:25 PM IST
1/6

विक्ट्री परेड

मुंबईतील मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम विक्ट्री परेड पार पडल्यानंतर टीम इंडियाचे काही खेळाडू घरच्या दिशेने रवाना होतील. तर चार खेळाडू उद्या मुंबईतच असणार आहे.

2/6

मुंबईच्या चार खेळाडूंचा गौरव

टीम इंडियातील मुंबईच्या चार खेळाडूंचा शुक्रवारी महाराष्ट्र विधानभवन संकुलात गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी सभागृहात दिली. 

3/6

खेळाडू घेणार एकनाथ शिंदेंची भेट

टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

4/6

विधानभवनात सन्मान

तसेच रोहित शर्मा, सूर्या, जयस्वाल आणि शिवम दुबे उद्या विधानभवनात देखील येतील. त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5/6

राजकीय वर्तुळात चर्चा

टीम इंडियाने भारतात पाय ठेवताच राजकीय वर्तुळात देखील चर्चा होताना दिसतीये. टीम इंडियाच्या ओपन बसवरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा लगावला होता.

6/6

बस गुजरातमधून का आणली?

इंडिया टीमचं मुंबईत नक्कीच स्वागत करतो पण टीम इंडियाची बस गुजरातमधून का आणली गेली? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.