Team India मधील असा खेळाडू, ज्याने पत्नी गरोदर असताना दिला घटस्फोट आणि...!

Indian Cricket Team : भारताचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यातील वाद काही केल्या लपला नाही. मुरली विजयने दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजारासोबत लग्न केलं. 

Jan 20, 2023, 20:06 PM IST
1/5

2007 साली दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत लग्न केले. पण वर्ष 2012 मध्ये दिनेश कार्तिकच्या पत्नीची भेट क्रिकेटर मुरली विजयशी झाली. यानंतर मुरली विजय आणि निकिता एकमेकांना पसंत करू लागले आणि त्यांच्या अफेअरला सुरूवात झाली.

2/5

त्यानंतर निकिता वंजारा आणि मुरली विजय दोघेही एकमेकांना भेटू लागले. हा प्रकार दिनेश कार्तिकला समजल्यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला.

3/5

दिनेश कार्तिकने ज्यावेळी निकिताला घटस्फोट दिला तेव्हा ती प्रेग्नेंट होती. घटस्फोटानंतर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केलं. 

4/5

असं म्हटलं जातं की, कार्तिकने कधीही आपल्या मुलावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला नाही.

5/5

2013 मध्ये निकिता वंजारा (Nikita Vanjara) आणि मुरली विजय (Murali Vijay) यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. यानंकर पुन्हा 2014 आणि 2017 मध्ये हे दोघंही आई-वडील बनले.