'तारक मेहता'च्या निर्मात्यांवर 'सोनू' भडकली, केला गंभीर आरोप, म्हणाली मालिका...

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सोनू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Sep 27, 2024, 16:09 PM IST
1/7

'तारक मेहता..'

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामधील सोनू भिडे म्हणजेच अभिनेत्री पलक सिधवानीला मालिका सोडायची आहे. पण तिला रोखलं जात आहे.   

2/7

पलक सिधवानी

पलकने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. कारण ती ही मालिका सोडणार आहे म्हणून असं तिच्यासोबत केलं जात आहे. 

3/7

नोटीस

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी तिला कराराचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. त्यावर अभिनेत्रीने या चुकीच्या बातम्या असल्याचे म्हटले होते. 

4/7

मालिकेचे नुकसान

आता नीला फिल्स प्रोडक्शनने नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने कराराचे उल्लंघन केले असून पात्रे आणि निर्मिती कंपनीचे नुकसान केले असल्याचं म्हटलं आहे.   

5/7

धमकी

अनेक इशारे देऊनही तिने करार मोडला. त्यानंतर निर्मात्यांनी तिच्यावर कारवाई केली. त्यामुळे अभिनेत्रीने मालिका सोडण्याची धमकी दिली. 

6/7

8 ऑगस्ट

रिपोर्टनुसार, आता अभिनेत्रीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 8 ऑगस्ट रोजीच तिने निर्मात्यांना मालिका सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली होती.   

7/7

म्हणून माझ्यावर आरोप

पण निर्मात्यांनी माझा राजीनामा मंजूर केला नाही. त्यानंतर कराराचे उल्लंघनाबद्दल बातमी वाचली. मी त्याच्या करारावर 5 वर्षांपूर्वी सही केली होती. मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्यावर हा आरोप केला जात आहे.