पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

Aug 04, 2020, 17:42 PM IST
1/5

पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

वर्षानुवर्षांची प्रतिक्षा आणि न्यायालयीन खटले, आरोप- प्रत्याोपांची सत्र आणि अर्थातच भक्तीचं एक वेगळं स्वरुप हे असं एकंदर चित्र आणि विविध टप्पे पाहिल्यानंतर अखेर अयोध्येमध्ये राम मंदिराच्या पायाभरणीचा दिवस उजाडत आहे.   

2/5

पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची पहिली वीट ठेवली जाईल. ज्यानंतर सारा देश एका वेगळ्या आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. याच निमित्तानं मंदिर न्यासाच्या वतीनं काही खास छायाचित्र सर्वांपुढे आणण्यात आली आहेत. 

3/5

पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

मंदिराचा प्रस्तावित आराखडा आणि प्रतिकृती मंदिर न्यासाकडून सादर करण्यात आली आहे. 

4/5

पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

सध्याच्या घडीला चर्चेचा विषय असणाऱ्या राम मंदिराचं भव्य स्वरुप पाहण्यासाठी अजून आणखी काही वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार असली, तरीही एकंदरच मंदिर कसं दिसेल याची झलक मात्र आतापासूनच अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे. 

5/5

पाहा असं असेल अयोध्येतील राममंदिर

अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या या मंदिराची उंची जवळपास १६१ फूट इतकी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंदिराचं हे प्रस्तावित स्वरुप पाहता आता साऱ्यांनाच त्याचं मुळ रुप पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.