Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळी मंगळ-बुधाची भयंकर युती! 'या' राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी; नाहीतर…

Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या आठवड्यात असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतात. 

Apr 17, 2023, 11:06 AM IST

Surya Grahan Bad Effect 2023 : येत्या वैशाख अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणाला ग्रहांचा अद्भूत संयोग दिसून येणार आहे. सूर्य राहू आणि बुधासोबत मेष राशीत असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ - बुधाची भयंकर युती या दिवशी जुळून येणार आहे. (surya grahan 2023 date mangal budh yuti negative effects on zodiac signs)

 

1/9

सूर्यग्रहणाला अशुभ योग

वैशाख अमावस्येला म्हणजे गुरुवारी 20 एप्रिलला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. यादिवशी मिथुन राशीत मंगळ आणि मेष राशीत बुध अशुभ योग निर्माण करत आहेत. यामुळे काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येणार आहे. 

2/9

मेष (Aries)

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे मेष राशीच्या लोकांसाठी सर्वाधिक अशुभ ठरणार आहे.  आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नका. या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

3/9

सिंह (Leo)

सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांच्या कामावर परिणाम दिसून येणार आहे. त्यांची होणारी कामं पण बिघडतील. त्याचा आयुष्यात अनेक चढ उतार त्यांना पाहावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे लक्ष द्यावे. 

4/9

वृषभ (Taurus)

सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. जीवनात अनेक समस्या निर्माण होणार आहे. करिअरमध्ये अडचणी येणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक गणित बिघडेल. 

5/9

कन्या (Virgo)

सूर्यग्रहणामुळे होणाऱ्या अशुभ योगामुळे आरोग्याची समस्या वाढणार आहे. आर्थिक स्थिती खराब होणार आहे. कुटुंबात वाद होणार असल्याने तणाव असणार आहे.   

6/9

तूळ (Libra)

या राशीसाठीही सूर्यग्रहणात निर्माण होणाऱ्या योगामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष द्या. होणारी कामं पूर्ण मार्गी लागणार नाहीत.   

7/9

मकर (Capricorn)

सूर्यग्रहणातील अशुभ योगामुळे करिअर आणि व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होणार आहे. वरिष्ठांशी सांभाळून वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. घरात आणि ऑफिसमध्येही ताण वातावरण असणार आहे.   

8/9

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांना शत्रूंपासून सावध राहवं लागणार आहे. आरोग्याची समस्या उद्भवून शकते. गाडी चालवताना काळजी घ्या. लांबची यात्रा करणे टाळा. 

9/9

हे उपाय करा!

सूर्यग्रहणातील अशुभ योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून प्यायल्याने सर्व राशींच्या लोकांना फायदा होईल, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)