NASA अंतराळवीरांना किती पगार देतं? महिन्याच्या पगाराचा आकडा पाहून व्हाल थक्क

NASA Astronauts Salary: सध्या अंतराळामध्ये अडकलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स चर्चेत आहे. मात्र त्याचबरोबर तिच्यासंदर्भातील इतर माहितीही इंटरनेटवर सर्च होत असतानाच नासाच्या अंतराळवीरांना नेमका किती पगार दिला जातो याबद्दलही अनेकदा सर्च केलं जातं. हेच जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Aug 28, 2024, 07:57 AM IST
1/7

sunitawilliamsbutchwilmore

अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स सध्या चर्चेत आहेत. अवघ्या 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेले सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर हे दोघेजण 8 महिने तिथे अडकून पडण्याची. मात्र आता त्यांना तांत्रिक अडचणींमुळे परतणं कठीण झालं आहे.

2/7

sunitawilliamsbutchwilmore

सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर हे दोघे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी बोईंगच्या स्टारलायनरमधून पोहोचले. मात्र बोईंगच्या या कॅपसूलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आता त्यांना 78 दिवसांहून अधिक काळ अंतराळात रहावं लागणार आहे. हे दोघेही आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात परत येतील असं नासाने सांगितलं आहे.  

3/7

sunitawilliamsbutchwilmore

नासाने एलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स'च्या मदतीने सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर या दोघांना परत आणण्याची योजना आखली आहे. मात्र त्यासाठी 2025 चा फेब्रुवारी महिना उजाडणार आहे हे नक्की. म्हणजेच सुनिताला दिवाळी, नाताळ, नवीन वर्षाची सुरुवात सारं काही अंतराळामध्येच साजरं करावं लागणार आहे.

4/7

sunitawilliamsbutchwilmore

मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीचं ड्रॅगन नावाचं अंतराळयान सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर या दोघांना परत पृथ्वीवर घेऊन येईल, असं नासाने सांगितलं आहे. हे अंतराळयान नियमित चाचण्यांसाठी पुढील महिन्यामध्ये अंतराळामध्ये झेप घेणार आहे. मात्र सुनिता आणि बेरी दोघे पृथ्वीवर परत येईपर्यंत त्यांच्या जीवा असणारा धोका कायम राहणार आहे.  

5/7

sunitawilliamsbutchwilmore

पण आपला जीव धोक्यात टाकून अमेरिकेतील अंतराळ संस्था म्हणजेच नासासाठी काम करणाऱ्या अंतराळवीरांना नासा नेमका किती पगार देतं? यासंदर्भात सध्या इंटरनेटवर सर्च करणाऱ्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खास करुन सुनिता आणि बेरी हे दोघे अंतराळात अडकल्यापासून अंतराळवीरांचा पगार हा चर्चेचा विषय ठरतोय. खरंच नासा अंतराळवीरांना किती पगार देतं ठाऊक आहे का? चाल हा आकडा किती आहे पाहूयात.

6/7

sunitawilliamsbutchwilmore

नासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार नासा दरवर्षी प्रत्येक अंतराळवीराला 1 लाख 52 हजार 258 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 1 कोटी 27 लाख रुपये पगार म्हणून देतं. म्हणजेच सुनिता विल्यम्स यांचा महिन्याचा पगार भारतीय चनलानुसार महिन्याला 10 लाख रुपये इतका आहे.

7/7

sunitawilliamsbutchwilmore

नासाच्या वेसबाईटनुसार  1 लाख 52 हजार 258 डॉलर्स हा पगार 2024 च्या आकडेवारीनुसार असून 2025 मध्ये त्यात गरजेनुसार बदल केला जाईल. नासाच्या अंतराळवीरांना जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नियुक्त केलं जातं. सर्वच अंतराळवीर कायम अंतराळात किंवा स्पेस स्टेशनवर नसतात. बराचसा वेळ ते जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये वेगवगळे प्रयोग करत असतात. या अंतराळवीरांना पगाराबरोबरच सुट्ट्या, भत्तेत आणि इतर सुविधाही दिल्या जातात.