कधी चिडवताना तर कधी चिडताना दिसला सैफ-करिनाचा मुलगा जेह; पाहा मजेदार फोटो

करिना आणि सैफला तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत. तैमूर आणि जेहची कायमच सोशल मीडियावर चाहतावर्ग आहे.

Mar 04, 2024, 20:08 PM IST

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान ही बॉलिवूडची फेवरेट जोडी आहे. या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जितकी या दोघांची लोकप्रियता आहे. तितकीच या जोडीच्या मुलांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. करिना आणि सैफला तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत. तैमूर आणि जेहची कायमच सोशल मीडियावर चाहतावर्ग आहे. करीना कपूरप्रमाणेच तिचे दोन्ही मुलगेही चर्चेत आहेत. तैमूरला खूप गोंडस म्हणतात, तर जेह नेहमीच माध्यमांसमोर मस्ती करताना दिसतो. 

 

1/7

जेह पापाराझींना चिडवताना दिसतो

सोशल मीडियावर करिना कपूरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

2/7

छेड काढताना दिसला जेह

पापाराझी कपूर कुटूंबीयांना फोटोसाठी पोझ देण्यासाठी सांगतात. त्याचनंतर जेह पापाराझींची छेड काढताना दिसतो.

3/7

चिडवताना दिसत आहे

याचबरोबर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये  जेह त्यांना दूरवरून पाहतो आणि  त्यानंतर त्यांना चिडवताना दिसत आहे.

4/7

नेहमीच जेहचे व्हिडिओ होतात व्हायरल

आम्ही तुम्हाला सांगतो की, जेहचे व्हिडिओ व्हायरल होणं ही काही नवीन गोष्ट नाही. तो अनेकदा चर्चेत असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर लहानग्या जेहला राग आला आणि त्याने पपाराझींना 'GO' असंही म्हटलं.

5/7

कॉफी विथ करणमध्ये करिनाने केला खुलासा

'कॉफी विथ करण 8' मध्ये संभाषणादरम्यान करिनाने सांगितलं होतं की, तिचा मोठा मुलगा तैमूर शांत स्वभावाचा आहे आणि जेह खूप मस्ती करतो.

6/7

व्हिडिओ व्हायरल

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी निघताना जेहने असे काही केले ज्यामुळे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.

7/7

व्हिडीओवरुन ट्रोल

अनेकांनी सैफ आणि करिनाला या व्हिडीओवरुन ट्रोल केलंय तर अनेकांना मात्र जेहचा हा क्यूटनेस खूपच आवडला आहे.