PHOTO : कानात झुमके आणि गोल्डन साडी..., शोभिता धुलिपालाचे साडीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष

साउथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला नेहमी तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

Soneshwar Patil | Sep 22, 2024, 13:33 PM IST
1/8

समुद्रकिनारी फोटोशूट

शोभिता धुलिपालाने समुद्रकिनारी साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट. वेगवेगळ्या लुकमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

2/8

गोल्डन साडी

अभिनेत्री शोभिता धुलिपालाने गोल्डन रंगाच्या साडीमध्ये जबरदस्त पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये तिने साडीवर मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. 

3/8

सुंदर लूक

तसेच शोभिता धुलिपालाने या फोटोमध्ये साडीसोबत जड कानातले घातले आहेत. ज्यामध्ये ती एखाद्या राणी सारखी दिसत आहे. 

4/8

सिंपल मेकअप

त्याचबरोबर अभिनेत्रीने यावेळी हातात बांगड्या परिधान केल्या असून तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी सिंपल मेकअप केला आहे. 

5/8

फोटोची चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री समुद्रकिनारी अनवाणी पायाने धावताना दिसत आहे. सध्या याच फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. 

6/8

गजरा

अभिनेत्रीने या फोटोमध्ये आपले केस मोकळे सोडले असून त्यामध्ये सुंदर असा गजरा लावला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. 

7/8

फोटोंना कॅप्शन

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'सूर्यास्त आकाश.. मला किरणांसारखे वाटते. प्रेससोबत लव्ह, सितारा याविषयी बोलली'  

8/8

कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.