Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण

Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं. 

Oct 17, 2023, 15:26 PM IST

Smita Patil Birth Anniversary : अवघ्या 10 वर्षांच्या कारकीर्द या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये अजून नवीन क्रांतीच केली होती. ज्या काळात अभिनेत्रींसाठी लूक महत्त्वाचा असतो अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये तिने फक्त अभिनयाच्या जोरावर अढळ स्थान निर्माण केलं. (Smita Patil cried all night after That song with Amitabh Bachchan and Big B accident was predicted along with his own death) 

1/15

अभिनेत्री स्मिता पाटील या नावातच सगळं आलं. हो पुण्यात जन्मलेली ही अभिनेत्री राजकारणाशी निगडीत कुटुंबातून अभिनय क्षेत्रात आली. आई तर समाजसेविका होत्या. आज त्यांचा जन्मदिवस...पण वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.   

2/15

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्या दूरदर्शनवर न्यूज अंकर होत्या. त्यानंतर त्यांनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. त्यांचा पहिला चित्रपट मेरे साथ चल त्या काळात ब्लॅक अँड व्हाइटमध्ये आला होता. 

3/15

मराठी असो किंवा हिंदी स्मिता पाटील ही अभिनेत्री सगळ्यांची चाहती झाली होती. 'निशांत, 'मंथन, 'भूमिका', 'द नक्सलाइट्स', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है, 'चक्र', 'नमक हलाल', 'बाजार', 'शक्ती', 'अर्थ', 'अर्ध सत्य', 'मंडी', 'शराबी', 'अनोखा रिश्ता', 'मिर्च मसाला' आणि 'वारिस' हे चित्रपट आजही बघितले जातात.   

4/15

 त्या काळात महेश भट्ट यांच्या अर्थ हा चित्रपट तुफान गाजला होता. शबाना आझमी आणि स्मिता पाटील या अभिनेत्रींच्या अभिनयाने तर सगळ्यांना निशब्द केलं होतं. 

5/15

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटाच्या वेळी महेश भट्ट आणि स्मिता पाटील यांचा वाद झाला होता. विवाहबाह्य संबंधांवर असलेला हा चित्रपट तुफान गाजला. तो लोकांना आवडलाही तर त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. 

6/15

चित्रपटाचे समिक्षक आणि अभ्यासक यांचं म्हणं होतं की, अर्थ हा चित्रपट महेश भट्ट यांच्या आयुष्यावर आधारीत होता. त्यावेळी महेश भट्ट लग्न झालं असतानाही परवीन बाबीच्या प्रेमात पडले होते. तर स्मिता पाटील विवाहित राज बब्बर आणि शबाना आझमी या विवाहित जावेद अख्तर यांच्या प्रेमात होत्या. 

7/15

महेश भट्ट आणि स्मिता यांच वादाचं कारण होतं की, या चित्रपटातील स्मिता पाटील यांचं अनेक दृश्यं एडिटिंग टेबलवर कापण्यात आली होती. शबाना आझमी यांना या चित्रपटात जास्त फुटेज देण्यात आलं होतं आणि महेश भट्ट यांनी माझी फसवणूक केली असा आरोपही त्यावेळी स्मिता पाटील यांनी केला होता. 

8/15

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की स्मिता आणि शबाना यांच्यामध्ये कायम शीतयुद्ध होते. त्या काळात या दोघींची कायम तुलना होत होती. पण या दोघींच्या कुटुंबात या अतिशय प्रिय. एका मुलाखतीत शबाना म्हणाल्या होत्या की, आमच्या कुटुंबांसाठी मी शबाना पाटील आणि ती स्मिता आझमी होतो, असं म्हटलं तरी फरक पडणार नाही. 

9/15

स्मिता पाटील यांच्या आयुष्यातील अजून एक किस्सा आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्या एका गाण्यानंतर त्या रात्रभर रडल्या होत्या. नमक हलालमधील 'आज रपट जाये तो..' या गाण्यातील बोल्ड दिसणं त्यांना पसंत पडलं नव्हतं. हे गाणं आपण करायला नको होतं असं त्यांना वाटलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सेटवर गेल्यावर बिग बींनी त्यांना समजवलं आणि ते गाणं पुन्हा शूट झालं. तेव्हा बिग बी आणि स्मिता यांची घट्ट मैत्री झाली. 

10/15

विवाहित राज बब्बर यांच्या सोबत त्या काळात त्या लिव्ह इनमध्ये राहत होत्या. त्यांच्यावर त्या काळात खूप टीका झाली होती. विवाहित स्त्री घर तोडणारी महिला म्हणून तिला हणवण्यात आलं होतं. राज बब्बर आणि स्मिता यांचे वारंवार भांडण व्हायचे. या भांडणाला वैतागून राज बब्बर पहिल्या पत्नीकडे परतले होते.

11/15

या नात्यामधून त्यांना प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पण मुलाचा जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. 

12/15

स्मिता पाटील यांना ज्योतिषशास्त्राची आवडत होती. त्या आपल्या हाताची रेषा बघून म्हणायच्या, माझं आयुष्यरेषा लहान आहे मी लवकरच मरण येणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच आपली शेवटची इच्छा सर्वांना सांगून ठेवलं होतं. माझ्या मृत्यूनंतर नवविवाहित वधूप्रमाणे सजवून मला निरोप द्यावा.

13/15

अगदी त्यांनी बिग बीच्या अपघाताचंही भाकीत केलं होतं. शक्ती चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एके दिवशी अमिताभ यांनी स्मिता यांना आपला हात दाखवला. त्यावेळी स्मिता पाटील यांनी भाकीत केलं होतं की, त्यांना गंभीर अपघात होणार आहे. 

14/15

त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी बिग बींना कुली चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरुमध्ये गेले. त्यावेळी एका रात्री स्मिता पाटील यांच्या बिग बींना फोन आला. त्या म्हणाल्या की, तुम्ही ठिक आहात ना?मला भयानक स्वप्न पडलं, तू दुखावला गेला आहेस. त्यावर अमिताभ म्हणाले मी ठिक आहे. तू काळजी करु नकोस.

15/15

पण या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींना अपघात झाला होता. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अगदी बिग बी मृत्यूच्या दारातून परत आले होते.