Shweta Tiwari Birthday: 500 रुपयांची नोकर करणारी 'ही' अभिनेत्री आज घेते सर्वाधिक मानधन

Shweta Tiwari Birthday: ‘कसौटी ज़िदगी की’ नावाच्या सिरीअलच्या माध्यमातून स्वत:ची ओळख बनवणारी आणि बिग बॉस सीझन 4 ची विनर ठरलेली बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीचा आज 42 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला तिच्या जीवनातील काही काजगी किस्से सांगणार आहोत. 

Oct 04, 2022, 18:08 PM IST
1/7

अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी श्वेताने वयाच्या 12 वर्षी एका ट्रॅव्हल एजेंसीमध्ये 500 रुपयांच्या पगाराची नौकरी करत होती. आज श्वेताची गणना हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

2/7

श्वेता तिवारी दोनवेळा लग्नाच्या बंधनात अडकली आहे. पण, तिचं वैवाहिक आयुष्य म्हणावं तितकं चांगलं राहिलं नाही. तिचं दोन्ही वेळाचा प्रपंच फार काळ टिकला नाही.

3/7

श्वेता तिवारीने पहिलं लग्न राजा चौधरीशी 1998 ला केलं होतं आणि त्यावेळी तिचं वय केवळ 18 वर्षे होतं. राजा आणि श्वेताला 'पलक' नावाची एक मुलगी आहे 

4/7

श्वेताने राजा चौधरीवर डोमॅस्टीक व्हायलंसचा आरोप केला आणि 2011 ला दोघांचा घटस्फोट झाला. 

5/7

यानंतर श्वेताने 2013 ला अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं आणि एका मुलाची आई बनली.  

6/7

श्वेताचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही दिवसांतच तिचं दुसऱ्यांदा घटस्फोट झाला. 

7/7

या वयातही श्वेता तिवारी दिसायला सुंदर आहे. तिने स्वत:ला कमालीचं मेनटेन ठेवलं आहे. श्वेताचं फॅनफॉलोइंग खुप जास्त आहे. इंस्टाग्रामवर तिचे 3.5 मिलीयनपेक्षा जास्त फॅन फॉलोइंग आहे.