'या' 5 भाज्या नियमित खा डेंग्यू जवळपासही येणार नाही; यादी एकदा पाहाच

Dengue Health Tips: भारतीय सलामीवीर शुभमन गिलबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. मात्र डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्यावर मात करण्यासाठी काही ठराविक भाज्या फारच फायद्याच्या ठरतात. या भाज्या कोणत्या आणि त्यांचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात...

| Nov 02, 2023, 16:09 PM IST
1/16

dengue health tips list of vegetables

भारताचा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूचा संसर्ग झाल्याने वर्ल्ड कप 2023 मधील पहिले 2 सामने खेळला नव्हता. डेंग्यूवर मात मिळवल्यानंतर शुभमन पुन्हा मैदानावर परतला.

2/16

dengue health tips list of vegetables

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. अजित पवार यांचे डॉक्टर संजय काकोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत, असं डॉ. काकोटे यांनी अजित पवारांच्या 'देवगिरी' या निवासस्थानाबाहेर 31 ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

3/16

dengue health tips list of vegetables

"अजित पवार यांना मागील 5 दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे. अजितदादांना मागील 4-5 दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे. एनएस1 टायटन स्ट्राँगलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. आता सुद्धा त्यांना 101 इतका ताप आहे," असं डॉ. काकोटे यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्या आहेत, असंही डॉ. कोकाटे म्हणाले. 

4/16

dengue health tips list of vegetables

डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अशाप्रकारे प्लेटलेट्सची संख्या कमी होणे प्रकृती धोकादायक ठरु शकतं. प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बासाइट्स या छोट्या आकाराच्या रक्तपेशी असतात. ब्लड क्लॉटींगला आणि ब्लीडिंग थांबवण्यासाठी या प्लेटलेट्स मदत करतात.

5/16

dengue health tips list of vegetables

त्यामुळेच प्लेटलेट्स कमी असतील तर ब्लीडिंग झाल्यास ते थांबवणं कठीण होतं. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी औषधं दिली जातात. अनेकदा डाएटमध्ये बदल सुचवला जातो. तसेच आराम, कमी ताण घेणं, जास्त पाणी पिणं यासारखे सल्ले दिले जातात. 

6/16

dengue health tips list of vegetables

मात्र केवळ योग्य भाज्यांच्या सेवनाने प्लेटलेट्सची संख्या वाढवता येते. या भाज्या कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात...

7/16

dengue health tips list of vegetables

पालक - पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन आणि फोलेटचं प्रमाण असतं. यामुळे ब्लड क्लोटिंगला आणि प्लेटलेट्स तयार होण्यास मदत होते.  

8/16

dengue health tips list of vegetables

तुमच्या आहारामध्ये पालकाचा समावेश असेल तर तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. पालक खाल्ल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.

9/16

dengue health tips list of vegetables

बीट - बीट ही फार पौष्टीक फळभाजी आहे. बीटामध्ये अॅण्टीऑक्सिटंड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. 

10/16

dengue health tips list of vegetables

बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट आणि अॅण्टीऑक्सिटंडचं प्रमाण अधिक असल्याने यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यासही मदत होते.

11/16

dengue health tips list of vegetables

गाजर - गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन एचं प्रमाण अधिक असतं. यामुळे रक्त पेशी आणि रोगप्रतिकारशक्ती अधिक सक्षम होण्यास मदत होते.

12/16

dengue health tips list of vegetables

रोज गाजराचा आहारामध्ये समावेश केल्यास शरीरामधील प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास बद होते. म्हणून रोज गाजर खाणं फायद्याचं ठरतं.

13/16

dengue health tips list of vegetables

ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये 'व्हिटॅमीन ए' चं प्रमाण अधिक असतं. 'व्हिटॅमीन ए'मुळे रक्त गोठवणारे घटक तसेच रक्तप्रवाह रोखण्यासंदर्भातील घटक वाढवण्यास मदत होते.

14/16

dengue health tips list of vegetables

ब्रोकोलीचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते.  

15/16

dengue health tips list of vegetables

लसूण - प्लेटलेट्स वाढवण्यासाठी लसूणही फायद्याचा असतो. लसणामध्ये असे घटक आढळतात जे प्लेटलेट्सच्या वृद्धीसाठी फायद्याचे ठरतात.

16/16

dengue health tips list of vegetables

लसणामधील घटकांमध्ये अॅण्टीथ्रॉम्बोटिक गुणधर्म आढळतात. यामुळे रक्त गोठण्यास मदत होते.