Raj Thackeray: राज ठाकरेंनी भर सभेत दाखवले धकक्कादायक फुटेज; माहिमच्या समुद्रातील 'हे' फोटो पाहून शॉक बसेल

Raj Thackeray:  मुंबईत माहीमच्या समुद्रात जे बांधकाम सुरु आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. भरसभेत व्हिडिओ दाखवून त्वरीत कारवाई करण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे. 

Mar 22, 2023, 21:41 PM IST

Raj Thackeray Rally : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात सध्याच्या राजकारणावर जोरदार भाष्य केले. राज ठाकरेंनी भर सभेत धकक्कादायक फुटेज दाखवले.  माहिमच्या समुद्रातील 'हे' फोटो पाहून सगळेच शॉक झाले आहे.  

1/7

माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. दोन वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं असं राज ठाकरे हा व्हिडिओ दाखवताना म्हणाले.

2/7

महिनाभरात कारवाई झाली नाही तर त्या दर्ग्याच्या बाजूला आम्ही गणपतीचं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.  

3/7

राज्यकर्त्यांचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असलं की काय तयार होतं, त्याचा दाखला देत राज ठाकरेंनी हा व्हिडिओ दाखवला.

4/7

समुद्रात अनधिकृतपणे दर्गा बांधला गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला.

5/7

मुंबईमध्ये माहीमच्या समुद्रात नवं हाजीअली तयार करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला.

6/7

राज ठाकरेंनी सभेमध्ये एक गंभीर व्हिडिओ दाखवत सरकारला आव्हान दिलं आहे. 

7/7

मुंबईत माहीमच्या समुद्रात नवं हाजीअली तयार करण्याचा डाव असल्याचा दावा या व्हिडिओ द्वारे करण्यात आला आहे.