अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी शकिरा नाही तर 'ही' गायिका घेणार 45 कोटी मानधन

भारतातील लोकप्रिय बिझनेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं दुसरं प्री-वेडिंग. अनंत आणि राधिका मर्चेंट यांचं दुसरं प्री-वेडिंग हे एका लग्झरी क्रुझवर सुरु आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे तर अजून काही सेलिब्रिटी हे हजेरी लावणार आहेत. अशात दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया...

Diksha Patil | May 31, 2024, 17:24 PM IST
1/7

शकिराच्या व्हिडीओची चाहत्यांना प्रतीक्षा

शकिरा अनंत अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार हे कळताच चाहत्यांचा उत्साह हा गगनात मावेनासा झाला आहे. 

2/7

किती घेतलं मानधन?

डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, शकिरा ही एका प्रायव्हेट कार्यक्रमासाठी 10 ते 15 कोटी मानधन घेते. 

3/7

द बॅकस्ट्रीट बॉईज

द बॅकस्ट्रीट बॉईजनं या कार्यक्रमाला परफॉर्म करण्यासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेतलं. 

4/7

कॅटी पेरी

कॅटी पेरी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी तब्बल 45 कोटी मानधन घेणार असल्याचं म्हटलं जातं.   

5/7

रिहाना

रिहानानं जामनगरमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी परफॉर्म केलं होतं. त्यासाठी तिला 74 कोटी दिल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले जाते.   

6/7

बीयॉन्से

बीयॉन्सेनं ईशा अंबानी आणि आनंद पिरमलच्या प्री-वेडिंगमध्ये 2019 रिपोर्टेडली 33 कोटींचं मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. 

7/7

क्रिस मार्टिनी

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी क्रिस मार्टिनीनं 8 कोटी रुपये मानधन घेतंल्याचं म्हटलं जातं. (All Photo credit : Social Media)