गणपतीची पर्यावरणपूरक आरास बघा झी 24 तासवर

कितीही दिवस बाप्पा आपल्याकडे राहिले तरी कमीच वाटतात. कारण गणपती असल्यावर सगळीकडे मंगलमय वातावरण असते. 

Sep 18, 2024, 15:03 PM IST
1/9

अश्विनी अभय वाळुंज, नेरुळ, नवी मुंबई

अश्विनी अभय वाळुंज, नेरुळ, नवी मुंबई

नेरूळ येथील एनआरआय कॉलनीत एक अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यात अश्विनी अभय वाळुंज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी  केलेल्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा. मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते आपल्या सर्व सदस्यांना एकत्र आणणारे एक केंद्रबिंदू आहे. अश्विनीजी यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने हे केदारनाथ मंदिर इतके सुंदर आणि आकर्षक बनवले आहे  की ते आपल्या बाप्पाला आणि त्यासोबतच आपल्या  सर्वांनाच भावेल.

2/9

हर्ष वाणी, भुसावळ

हर्ष वाणी यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेचा गाभारा तयार केला आहे. यात संपूर्ण कुटुंबाने मिळून देवीची ३.५ फुटाची शाडू मातीची मूर्ती तयार केली आहे.  

3/9

संतोष काटवले, चेंबूर

एक अतिशय महत्त्वाची पण दुर्लक्षित समस्या म्हणजे भूक. अतिशय प्रतिकूल परिस्थिती अनेक लोक रोज उपाशी राहतात, लहान मुलेही कुपोषित असतात. तर दुसरीकडे अन्नाची नासाडी होत असते. असे होऊ नये म्हणून आणि अन्नाचे महत्त्व सगळ्यांना कळावे यासाठी काटवले परिवाराने हा देखावा साकारला आहे.

4/9

दिलीप भुजारी, नाशिक

नाशिकच्या भुजारी कुटुंबियांनी आपल्या गणपतीसाठी सुंदर असे मंदिर साकारले आहे. 

5/9

हृषीकेश जाधव, पनवेल

यांनी आपल्या गणपतीचा देखावा म्हणून आपल्या आठवणीतले घर साकारले आहे.  

6/9

अजिंक्य म्हात्रे, अलिबाग

अलिबागच्या अजिंक्य म्हात्रे यांनी 'सरकार आम्हाला लाडकी बहिण योजना नसली तरी चालेल पण सुरक्षित बहिण योजना हवी' असे म्हणत एक सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे. 

7/9

पंकज थोरात, नाशिक

आजी-आजोबा आणि नातवंडांचे एक वेगळेच नाते असते.  थोरात यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान असणाऱ्या आजीला संमर्पित असा देखावा तयार केला आहे.

8/9

प्रकाश कटके, कुर्ला

प्रकाश कटके यांनी कुर्ला बसस्थानक साकारले आहे. 

9/9

शिल्पा डांगे, कोल्हापूर

कोल्हापूरच्या डांगे यांनी आपल्या वसुंधरेची सध्याची स्थिती मांडून एक सामजिक संदेश दिला आहे. तर गणेश मुर्ती काळ्या मातीपासून बनवलेली आहे.