Saree Cancer : महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?

Saree Cancer : साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे. प्रत्येक महिलांकडे असंख्य साड्या असतात तरीदेखील त्यांना त्या कमी वाटतात. पण साडी नेसण्याची त्यांची एक सवय त्यांना कर्क रोगाच्या जवळ घेऊन जाते. या कॅन्सरला वैद्यकिय भाषेत साडी कॅन्सर असं म्हणतात. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. 

| Nov 08, 2024, 13:42 PM IST
1/7

साडी ही सहावारी आणि नऊवारी अशा दोन स्वरुपात असते. हा भारतात महिलांचा पारंपारिक पोषाख मानला जातो. पूर्वी महिला साडीच नेसायच्या. पण हल्ली खास प्रसंगी आणि सणासुद्दीला महिला साडी नेसतात. पण या साडीसंदर्भात एक महत्त्वाच संशोधन समोर आलंय. 

2/7

साडी नेसायचं म्हटलं की परकर आलाच. परकर हा साडी खोचण्यासाठी वापरला जातो. शिवाय अनेक महिला साडी सुटू नये म्हणून साडी बांधण्यासाठी परकर अगदी घट्ट कमरेला बांधतात. परकर घट्ट बांधल्यामुळे कमरेला त्याचे घर्षण होऊ लागते आणि त्वचा सोलून काळी पडते. वारंवार त्वचा सोलली गेली का कॅन्सरसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो.

3/7

या संशोधनानुसार साडी कॅन्सर किंवा पेटीकोट कॅन्सरचा धोका महिलांमध्ये सर्वाधिक बळावला आहे. साडीचा कर्करोग ही एक दुर्मिळ स्थिती आहे, जी दररोज साडी नेसणाऱ्या महिलांना प्रभावित करू शकते. हा कर्करोग शरीराच्या त्या ठिकाणी होतो जिथे साडी बांधली जाते, म्हणजे कंबरेचा मधला भागी याचा प्रभाव दिसतो. 

4/7

बिहार आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की अनेक भारतीय महिला साडी नेसताना पेटीकोटला खूप घट्ट बांधतात. पेटीकोट घट्ट बांधल्याने त्वचेवर सतत घासणे आणि दाब होऊ शकतो. दीर्घकाळ असे केल्याने कर्करोग होऊ शकतो. इंडिया टुडेच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी दोन वृद्ध महिलांची प्रकरणे नोंदवली आहेत ज्यांना 'मार्गोलिन अल्सर' नावाचा त्वचेचा कर्करोग झाला आहे. हा अहवाल नुकताच बीएमजे केस रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.

5/7

पेटीकोटच्या घट्ट नाभीमुळे बराच काळ चिडचिड होऊ शकते. भारतीय उन्हाळ्यात विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या झपाट्याने वाढू शकते. घट्ट साडीमुळे त्वचेचा रंग बदलणे किंवा किंचित चकचकीत होणे ही गंभीर लक्षणे असू शकतात.

6/7

साडीचा कॅन्सर म्हणजे साडी नेसल्याने कॅन्सर होईल असं नाही, तर हा एक प्रकारचा स्किन कॅन्सर आहे, जो पेटीकोट खूप घट्ट बांधल्यामुळे होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नाडा बराच वेळ एका स्थितीत बांधून ठेवल्यास त्यामुळे हा धोका वाढतो. 

7/7

साडीच नाही तर पुरुष धोतर घट्ट बांधले असेल आणि महिला घट्ट चुरीदार घालत असतील तरही या त्वचेच्या कॅन्सरचा धोका असतो. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)