सलमानचा नकार ठरला वरदान! 'या' चित्रपटांत भाईजानला रिप्लेस करुन SRK झाला किंग खान

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies: सध्या अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान हे चांगले मित्र आहेत. दोघांचीही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मात्र तुम्हाला सांगितलं की सलमान खानने नकार दिलेल्या अनेक चित्रपटांमुळे शाहरुख खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा बादशाह झाला. तुम्हाला खरं तर हे वाचून आनक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. सलमानने नकार दिलेले आणि शाहरुख ज्यामुळे सुपरस्टार झाला असे चित्रपट कोणते हे पाहूयात...

Swapnil Ghangale | Jun 13, 2023, 18:17 PM IST
1/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

अगदी खरं सांगायचं झाल्यास शाहरुख खानने त्या प्रत्येक चित्रपटामध्ये काम केलं जो चित्रपट सलमान खानने नाकारला.

2/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

सलमानने नाकारलेल्या चित्रपटांना शाहरुखने होकार दिला आणि शाहरुख याच चित्रपटांच्या जोरावर हिरो झाला.

3/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

सलमानने नाकारलेले पण शाहरुखन स्वीकारलेले हे चित्रपट शाहरुखच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले. या यादीमधील गाजलेले चित्रपट कोणते यावर टाकलेली नजर...

4/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

1990 च्या दशकामधील गाजलेल्या चित्रपटांमध्ये आवर्जून नाव घेता येईल असा चित्रपट म्हणजे 'जोश'! मंन्सूर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्येही शाहरुखऐवजी सलमानच दिसला असता.

5/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

'जोश' चित्रपट शाहरुखच्या आधी सलमानला ऑफर करण्यात आला होता. मात्र सलमानने इतर चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचं कारण देत या चित्रपटाला नकार दिलेला. या चित्रपटामध्ये नंतर शाहरुखने काम केलं.

6/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाजीगर' चित्रपटामध्ये शाहरुखने नकारात्मक भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता.

7/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

'बाजीगर'ने तिकीटबारीवर दणक्यात कमाई केली. मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे की आधी या चित्रपटातील व्हिलनची भूमिका सलमानला ऑफर करण्यात आलेली. सलमानने या भूमिकेला नकार दिल्यानंतर ती शाहरुखने साकारली.

8/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

'कल हो ना हो' हा प्रिती झिंटा, शाहरुख खान आणि सैफ अली खानचा चित्रपटही चांगलाच गाजली. हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता.

9/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

'कल हो ना हो'मधील प्रमुख भूमिकेसाठी करण जोहरने आधी सलमान खानला ऑफऱ दिली होती. मात्र सलमानला या चित्रपटामध्ये सेकेण्ड लीड म्हणजेच दुहेरी भूमिका करण्याची इच्छा नव्हती. मेन रोल मिळत नसल्याने सलमानने 'कल हो ना हो' चित्रपट नाकारला. नंतर हीच भूमिका शाहरुखने केली.

10/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी ठरलेली लव्हस्टोरी अशी ओळख असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपटसुद्धा या यादीमध्ये आहे याचं तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.  

11/11

Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'साठी निर्मात्यांनी पहिली पसंती शाहरुख नाही तर सलमानला होती. मात्र काही कारणांनी सलमानला या चित्रपटात काम करणं शक्य झालं नाही हा चित्रपट शाहरुखने केला.