बोल्डनेसचा डबल डोस! सई ताम्हणकर इम्रान हाश्मीबरोबर झळकणार; सई म्हणाली, 'आम्ही एकत्र..'

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi: बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. यासंदर्भात ती फारच उत्साही असून तिने आपला आनंद नुकताच शेअर केला आहे. विशेष म्हणजे यापैकी एका चित्रपटामध्ये ती बॉलिवूडमधील किसर बॉय असलेल्या इम्रान हाश्मीबरोबर स्क्रीनशेअर करणार आहे. या चित्रपटाबद्दल ती काय म्हणाली आहे पाहूयात... 

Swapnil Ghangale | Mar 31, 2024, 14:27 PM IST
1/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची परिक्षक सई ताम्हणकरला बॉलिवूडमध्ये दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. 'ग्राऊण्ड झिरो' आणि 'अग्नी'मध्ये सई झळकणार आहे.

2/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

बॉलिवूडचा किसर बॉय अशी ओळख असलेला अभिनेता इम्रान हाश्मीबरोबर सई 'ग्राऊण्ड झिरो'मध्ये सई झळकणार आहे.  

3/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

तर 'स्कॅम 1992' फेम प्रतिक गांधीबरोबर सई 'अग्नी'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  

4/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

सईला हे दोन मोठे प्रोजेक्टस मिळाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आपल्या आवडत्या अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर कधी पाहतोय असं त्यांना झालं आहे.  

5/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

सई आणि इम्रान हाश्मी यांची जोडी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. दोन अगदीच वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.  

6/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

तसेच प्रतिक गांधीसारख्या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणार असल्यानेही सई फारच उत्साही आहे. हे दोन्ही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.  

7/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

या चित्रपटांबद्दल बोलताना सईने, "ही फार मस्त फिलींग आहे. कारण हे प्रोडक्शन हाऊस असं आहे की त्यांच्याबरोबर काम करावंसं प्रत्येक कलाकाराला वाटतं. मला तर त्यांच्याबरोबर 3 वेळा काम करण्याची संधी मिळाली आहे. मी 'डबा कार्टेल'मध्येही काम केलं आहे. माझ्या मते माझ्या करिअरमधील हा फार पॉमिसिंग कालावधी आहे," असं सांगितलं.

8/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी फारच भन्नाट अभिनेते आहेत असंही सईने म्हटलं आहे.  

9/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

आमची ही वेगळी जोडी पाहायला चाहत्यांनाही नक्कीच आवडेल असंही सईने म्हटलं आहे. आपल्या या दोन्ही भूमिकांमुळे चित्रपटसृष्टीमध्ये मोठी स्वप्न पाहणाऱ्या इतरांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा सईने व्यक्त केली आहे.

10/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

"मला त्या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आम्ही एकत्र येऊन जे काही तयार केलं आहे त्याचा अनुभव चाहत्यांना मिळणार असल्याने मी त्यांच्यासाठीही फार उत्साही आहे," असं सई म्हणाली.

11/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

"हे फार मस्त फिलिंग आहे. मला अपेक्षा आहे की या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी मी नवीन दारवाजे उघडत आहे, असं मला वाटतं. भविष्यातही मी असं करत रहावं अशी माझी अपेक्षा आहे," असं सईने नमूद केलं.

12/12

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi Pratik Gandhi

'ग्राऊण्ड झिरो' आणि 'अग्नी'बरोबरच सई ओटीटीवरच येणाऱ्या 'डबा कार्टेल'मध्येही झळकणार आहे. या चित्रपटांमध्ये शबाना आझमी, ज्योतिका, गिराज राव यासारखे ज्येष्ठ आणि नामांकित कलाकार आहेत.