IND vs AUS : भारत कि ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? फोटोशूट झाला अन् मिळाले शुभ संकेत

IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Saurabh Talekar | Nov 18, 2023, 20:36 PM IST
1/6

इंडिया अजिंक्य

यंदाच्या स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य आहे. तर ऑस्ट्रेलियाने देखील दमदार कामगिरी करत अशक्य असे विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. 

2/6

टीम इंडिया

सेमीफायनलमध्ये तगड्या साऊथ अफ्रिकेचा पराभव केल्याने आता टीम इंडिया देखील पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल. 

3/6

शूभ संकेत

वर्ल्ड कप फायनलपूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांचं वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटोशूट झालं. यावेळी टीम इंडियाला शूभ संकेत मिळाले आहेत. 

4/6

16 वर्षाचा इतिहास

फोटोशूटवेळी जो कॅप्टन डाव्या बाजूला उभा राहिला, त्यानेच वर्ल्ड कप जिंकल्याचा आत्तापर्यंतचा मागील 16 वर्षाचा इतिहास राहिला आहे.

5/6

रोहित शर्मा डाव्या बाजूला

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये देखील रोहित शर्मा फोटोशूटमध्ये डाव्या बाजूला होता. त्यामुळे वर्ल्ड कप भारत नोंद करणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

6/6

भारत (संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.