द होल वावर इज आवर! सर्वात श्रीमंत शेतकरीही मुकेश अंबानीच, 600 एकर जमिनीवर काय पिकवतात माहितीये?
Richest Farmer of India : जेव्हा कधी आपण देशातील श्रीमंत व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर व्यावसायिकांची नावं येतात. पण देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण आहे, असं विचारलं तर कोणाची नावं तुम्हाला माहितीये. खरं तर उद्योजकच नव्हे सर्वात श्रीमंत शेतकरीसुद्धा मुकेश अंबानीच आहे. 600 एकर कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी सोनं उगवलं.
नेहा चौधरी
| Dec 16, 2024, 18:38 PM IST
1/8

देशातील सर्वात मोठे शेतकरी हे उत्तर प्रदेशातील दौलतपूरमधील रामशरण वर्मा आहे. रामशरण वर्मा यांनी 6 एकर वडिलोपार्जित जमिनीपासून 300 एकर जमिनीपर्यंतचा प्रवास गाठलाय. 1986 पासून शेती करुन त्यांनी शेतीत क्रांती केलीय. त्यासाठी त्यांना 2019 मध्ये मोदी सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आला होता. रामशरण वर्मा हे मुख्यतः भाजीपाल्याची शेती करत असून त्यांची वार्षिक उलाढाल करोडोंमध्ये आहे.
2/8

रामशरण वर्मानंतर राजस्थानचे रमेश चौधरीदेखील भारतातील श्रीमंत शेतकरीपैकी एक आहे. जयपूरचे रहिवासी असलेले रमेश चौधरी तीन पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊसचे मालक आहेत. त्याचा या पॉलीहाऊसमध्ये टोमॅटो आणि काकडीची लागवड केलीय. याशिवाय ग्रीन हाऊसमध्ये फुलांची लागवड करण्यात येते. रमेश चौधरी यांच्या शेतातही मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. त्यांची वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक आहे.
3/8

ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये करिअरची सुरुवात करणारे प्रमोद गौतम आज शेतीतून वर्षाला एक कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारे शेतकरी आहेत. शेती सुरू करण्यापूर्वी ते एका कंपनीत काम करायचे. 2006 मध्ये त्यांनी नोकरी सोडून 26 एकर शेतीवर पिक घेण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी भुईमूग आणि तुरीची लागवड केली मात्र त्यांना नुकसान सहन करावे लागले. पण त्यांनी धीर सोडला नाही आणि त्यानंतर त्यांनी संत्री, द्राक्षे, केळी, पेरू आदी बागांची लागवड करुन आज ते प्रचंड नफा कमावतात.
4/8

छत्तीसगडचे सचिन काळे हे शेतीच्या बाबतीत देशात चौथ्या क्रमांकावर येतात. सचिननेही आपल्या करिअरची सुरुवात नोकरीपासून केली असली तरी 2014 मध्ये नोकरी सोडून शेतीकडे वळले. त्यांनी स्वतःची इनोव्हेटिव्ह ॲग्रीलाइफ सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. ही कंपनी शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन कंत्राटी शेती करते. आज त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे अडीच कोटींच्या घरात आहे.
5/8

राजस्थानचे रहिवासी असलेले हरीश धनदेव हे एकेकाळी इंजिनिअर होते. पण त्यांनी नोकरी सोडून शेतीचा धास धरला. कोरफडीच्या लागवडीपासून सुरुवात करून त्यांनी या वनस्पतीवर प्रक्रियाही सुरू केली. आज त्यांनी सुमारे 100 एकर क्षेत्रात कोरफडीची लागवड केलीय. हरीश धनदेव यांचा वार्षिक व्यवसाय सुमारे अडीच कोटींचा घरात गेली आहे.
6/8

बिहारच्या बस्तर जिल्ह्यातील डॉ.राजाराम त्रिपाठी हे पांढरी मुसळी आणि काळी मिरी यांचं सर्वाधिक उत्पादक करतात. ते 400 कुटुंबांसह 1000 एकर जमिनीवर सामूहिक शेती करुन शेतीमध्ये क्रांती घडवलीय. त्यांचे शेतीचे साम्राज्य इतके मोठे आहे की त्यांनी त्याची काळजी घेण्यासाठी हेलिकॉप्टर मागवलंय. राजाराम त्रिपाठी यांना आतापर्यंत देशातील सर्वोत्तम शेतकरी हा पुरस्कार मिळाला आहे. 25 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुपचे ते सीईओ आहेत. त्याचा समूह युरोपियन आणि अमेरिकन देशांमध्ये काळी मिरी निर्यात करतो.
7/8
