PHOTO : रेणुका शहाणेने पहिल्या पतीला का दिला घटस्फोट? 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत केलं लग्न, कुटुंबाचा लग्नाला विरोध

Renuka Shahane birthday : रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांचा लग्नाला 22 वर्षे पूर्ण झालं आहेत. पण तुम्हाला माहितीये रेणुका शहाणे हिचं पहिलं लग्न का मोडलं ते?

Oct 07, 2024, 10:47 AM IST
1/10

अभिनेत्री रेणुका शहाणे आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. रेणुकाचा जन्म हा मुंबईतील. तिने मिठीबाईमधून कला शाखेत पदवी घेतली. रेणुकाने मराठी चित्रपटसृष्टीतून तिच्या करिअरला सुरुवात केली. 

2/10

पण तिला खरी ओळख मिळाली ती छोट्या पडद्यावरील अनेक हिट शोमधून. त्यातील एक होता रविवारी दूरदर्शनवर असणाऱ्या सुरभि या शोमधून ती घराघरात पोहोचली. रेणुका शहाणे यांनी 1989 मध्ये दूरदर्शनवरील 'सर्कस' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली

3/10

रेणुका शहाणे हिचं पहिलं लग्न हे मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाला होता. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांनी लवकरच घटस्फोट घेतला. विजयला रेणुकाने मराठी चित्रपटांव्यतिरिक्त कोठेही काम करावे असे वाटत नव्हतं म्हणून हे लग्न मोडलं असं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलंय. 

4/10

विजय केंकरे यांनी केवळ मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विजय खूप अहंकारी होता. दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होत होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

5/10

त्यानंतर रेणुकाने 'हम आपके है कौन' या चित्रपटात सलमान खानसोबत सहाय्यक भूमिका साकारली होती. या पात्राने त्याला रातोरात स्टार बनवलं.

6/10

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची पहिली भेट हंसल मेहताच्या 'जयते' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आशुतोषने हम आपके है कौन पाहिला होता. त्यामुळे तो रेणुकाचा खूप मोठा चाहता होता. 

7/10

पहिल्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ते त्यावेळी अर्धा तास बोलत राहिले. त्यावेळी रात्री उशिर झाल्याने आशुतोषने लिफ्ट देण्यासाठी विचारलं होतं. त्यानंतर तीन महिने ते एकमेकांशी फोनवर बोलत होते. 

8/10

त्यानंतर आशुतोषने तिला एक सुंदर कविता लिहून प्रपोज केलं. रेणुका ही आशुतोषपेक्षा चार वर्ष मोठी होती. त्यांचा लग्नाला कुटुंबाकडून विरोध होता. कारण रेणुका मराठी आणि मध्य प्रदेशमधील होता. 

9/10

त्यामुळे रेणुकाच्या कुटुंबाला वाटतं होतं की, हे लग्न फार काळ टिकणार नाही. संस्कृती भिन्न असल्याने त्यांचा या लग्नाला विरोध होता. रेणुका शहाणे एका मुलाखत म्हणाली होती, आशुतोषसोबतच लग्न त्यांना जुगार वाटत होता. 

10/10

या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून दोघांनी 2001 साली लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही आहेत.