PHOTO: तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आनंद आश्रमात; म्हणाले 'मला जुने दिवस आठवले, आनंद दिघे असताना...'

Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात आले. 

Saurabh Talekar | May 13, 2024, 11:47 AM IST

Raj Thackeray in Thane : राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

1/6

राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचताच शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. 

2/6

आनंद आश्रमाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी सभेत बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या.

3/6

सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो, तेव्हा सगळे जुने दिवस आठवले. आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

4/6

आनंद दिघे यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसोबत अनेकदा ठाण्याला आलो आहे, अशी आठवण देखील राज ठाकरेंनी व्यक्त केली.

5/6

तेव्हाच ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होतं. पण आज सगळं चित्र बदललं आहे. एके काळचं तलावांच शहर टँकरचं शहर झालंय, असंही राज ठाकरे म्हणाले.

6/6

ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे ७ ते ८ महापालिका आहेत. हे का झालं ? याला कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा मराठीचा मुद्दा मांडला.