वादळाने मुंबईची दैना! घाटकोपरमध्ये होर्डिंग तर वडाळयात लोखंडी टॉवर कोसळला... रेल्वेही विस्कळीत
Mumbai Rain : मुंबईत दुपारच्या सुमारस अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसाने दैना उडवली. वादळी वाऱ्याने घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं..अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती आहे. तर वडाळ्यात 3 मजली उंच लोखंडी ढाचा कोसळला. पावसामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी मुंबईकरांचे हाल झाले.
राजीव कासले
| May 13, 2024, 19:33 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती. धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवण्यात आली. दुसरीकडे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ओवर हेड वायर तुटली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजच्या समोर ठाणे रेल्वे स्थानकासमोर युद्ध पातळीवर काम सुरुय.
5/7
6/7