170 kmph टॉप स्पीड अन् किंमत... राहुल गांधी ज्या बाईकवर लडाखला गेले तिचे फिचर्स पाहिलेत का?

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh: मागील काही काळापासून कधी शेतकरी तर कधी बाईक मेकॅनिक्स तर कधी ट्रॅक चालकांच्या भेटीगाठी घेणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आता थेट लडाखला पोहोचले आहेत. राहुल गांधीं लडाखच्या दौऱ्यादरम्यान बाईक रायडिंग करताना दिसले. त्यांनीच त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर हॅण्डलवरुन आपल्या या बाईक राईडचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना चांगली पसंती मिळत असून लाखोंच्या संख्येनं या फोटोंना लाईक्स आहेत. पाहूयात त्यांनी कोणत्या बाईकवरुन हा प्रवास केला, या बाईकची किंमत काय आणि तिची स्पेसिफिकेशन्स काय आहेत...

| Aug 20, 2023, 08:18 AM IST
1/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून लडाखच्या दौऱ्यावर आहेत.  

2/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

शनिवारी राहुल गांधी यापूर्वी कधीही न दिसलेल्या अवतारामध्ये पाहायला मिळाले.

3/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधी स्वत: बाईक चालवत लडाखमधील पँगाँग येथे पोहोचले.

4/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधी आज जगप्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठी त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करणार आहे.

5/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधींनी या बाईक राइडचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईक चालवताना दिसत आहेत.

6/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधी एखाद्या प्रोफेश्नल बाईकरप्रमाणे हेल्मेट, ग्लोव्हज, रायडिंग बुट्स आणि जॅकेट अशा रायडर पोजमध्ये दिसले. 

7/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

लडाखच्या खोऱ्यातून बाईक राईडचा आनंद राहुल गांधींनी घेतल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळाला.

8/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

"पँगाँगच्या मार्गावर... ही जागा जगातील सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे असं माझे वडील म्हणायचे," अशा कॅप्शनसहीत राहुल गांधींनी हे फोटो शेअर केले आहेत.

9/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधींचा लडाख दौरा 25 ऑगस्टपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. याच दौऱ्यादरम्यान सध्या ते पँगाँगमधील प्रसिद्ध तलावाच्या परिसरामध्ये आहेत.

10/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

ट्विटरवर हेच फोटो शेअर करताना राहुल गांधींनी 'Upwards and onwards - Unstoppable!' अशा कॅप्शनसहीत हे फोटो शेअर केले आहेत.

11/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधींचे हे फोटो काँग्रेसच्या अकाऊंटवरुनही कोलाज करुन 'सफर' अशा कॅप्शनसहीत शेअर करण्यात आले आहेत.

12/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन राहुल गांधींचा लडाखमध्ये बाईक चालवताना आणि काही आठवड्यांपूर्वी ट्रॅक्टर चालवतानाचा फोटो शेअर करत 'जय जवान, जय किसान' अशी कॅप्शन दिली आहे.

13/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

काही आठवड्यांपूर्वी बाईक मेकॅनिक्सच्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईकबद्दल सांगितलं होतं. "माझ्याकडे केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर आहे. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे मला ती चालवू दिली जात नाही," असं राहुल म्हणाले होते.

14/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर ही बाईक 373 सीसीची बाईक आहे. या बाईकची सर्वाधिक क्षमता 43 बीपीएच इतकी आहे. पिकअप टॉर्क 37 एनएम असून बाईकचा सर्वाधिक वेग हा ताशी 170 किलोमीटर प्रती तासापर्यंत जाऊ शकतो.

15/15

Rahul Gandhi Bike Ride To Ladakh

राहुल गांधी ज्या केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर बाईकने पँगाँगला पोहोचले तिची किंमत 3 लाख 38 हजार ते 3 लाख 60 हजारांदरम्यान असल्याचं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.