पुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती

Pune - Ahmednagar - Chhatrapati Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे सर्वसामान्यांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे. 

Mar 11, 2024, 12:17 PM IST
1/8

नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे पुणे ते औरंगाबाद दरम्यानचा प्रवास हा 4 तासांवरून 2 तासांपर्यंत येणार आहे. 

2/8

नागपूर ते पुणे दरम्यानचा प्रवास हा 8 तासांचा आहे तो आता या महामार्गमुळे 6 तासांवर येणार आहे. 

3/8

या महामार्गासाठी 3752 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी अंदाजे 4437 कोटी रुपये खर्च झाला आहे. 

4/8

तर या प्रकल्पाची अंदाजे किंमत 7,132 कोटी रुपयांचा घरात असणार आहे. संपूर्ण रस्ता ग्रीन कॉरिडॉर, वृक्षारोपण, सौरऊर्जा निर्मिती, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनने परीपूर्ण असणार आहे. 

5/8

टोलचं बोलायचं झालं तर शिरूर ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान चार टोलनाके असणार आहे. तर छत्रपती संभाजी नगर ते अहमदनगर दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. 

6/8

पुणे औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरं पुणे आणि औरंगाबाद यांना जोडणारा आधुनिक रस्ता असणार आहे.

7/8

चौपदरी राष्ट्रीय महामार्गाने छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शहर जोडलं जाणार आहे. या रस्त्यावर सुमारे 90 हजार पीसीयूची वाहतूक होणार आहे. 

8/8

हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे 701 किमीच्या बांधकाम झाल्यानंतर समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई - नागपूर द्रुतगती मार्गशी जोडला जाणार आहे.