टीम इंडियाचा स्टार खेळाडू 23 वर्षांच्या पंतची कमाई पाहून व्हाल थक्क!

ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. टीम इंडियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तो खेळणार आहे. याशिवाय इंग्लंड दौऱ्यासाठी देखील त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.  

Jun 03, 2021, 11:48 AM IST
1/5

ऋषभ पंतची संपत्ती

ऋषभ पंतची संपत्ती

ऋषभ पंतने 2020 मध्ये 29.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फोर्ब्स 2019च्या सेलिब्रिटी यादीमध्ये त्याने 30वं स्थान मिळवलं आहे. एवढ्या कमी वयात एवढी संपत्ती मिळवणाऱ्या ऋषभची जगभरात चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2021 मध्ये पंतची एकूण संपत्ती 5 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय रुपयांनुसार 36 कोटी संपत्ती असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर पंतचे वार्षिक उत्पन्न 10 कोटी रुपये आहे. तर तो महिन्याला 30 लाख रुपये कमावतो. 

2/5

ऋषभ पंतची यशस्वी झेप

ऋषभ पंतची यशस्वी झेप

BCCIने वार्षिक प्लेअर कॉन्ट्रॅक्टमध्ये पंतला ए ग्रेड श्रेणीमध्ये ठेवलं आहे. त्यानुसार पंतला 5 कोटी रुपये पगार मिळतो. प्रत्येक कसोटी सामन्यामागे 3 लाख आणि वन डे सामन्यामागे 2 लाथ रुपये तर टी 20 सामन्यासाठी 1.50 लाख रुपये मिळतात. या शिवाय iplमध्ये दिल्ली संघाकडून पंतला 8 कोटी रुपये मिळतात.   

3/5

या कंपनीसोबत आहे करार

या कंपनीसोबत आहे करार

 ऋषभ पंतने काही ब्रॅण्ड्स सोबत करार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या संपत्तीमधील 40 टक्के वाटा हा या करारामधून येतो. SG and Adidas cricket सारख्या कंपन्यांसोबत पंतने करार केला आहे. विराट आणि धोनीसोबत पंत देखील बूस्टचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिटर आहे. तर गेल्या वर्षी पंतने JSW स्टीलसोबत 3 वर्षांचा करार केला आहे. 

4/5

ऋषभ पंतचं कार कलेक्शन

ऋषभ पंतचं कार कलेक्शन

पंतचं कार कलेक्शन खूपच लहान आहे.  Merecedez, Audi A8 and Ford सारख्या गाड्या आहेत. याशिवाय पंतचा उत्तराखंड आणि हरिद्वारमध्ये एक घर देखील आहे. या घराच्या किमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही.   

5/5

ऋषभ पंतचं कसोटीतील कामगिरी

ऋषभ पंतचं कसोटीतील कामगिरी

ऋषभ पंतने भारतासाठी 20 कसोटी सामने 18 वन डे आणि 33 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीमध्ये 1358 वन डे मध्ये 529 आणि टी 20 मध्ये 512 धावा केल्या आहेत. ipl 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची जबाबादारी पंतच्या खांद्यावर होती. त्याने ती उत्तम पद्धतीनं निभावत आहे.