Personality Test: तुमचं बोट सरळ, टोकदार की तिरकस? यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्व

Personality Test Finger Shapes : प्रत्येक माणसाचे अवयव एकसारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये काहींना काही वेगळेपण असतेच. शरीरातील प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो यापैकीच एक म्हणजे आपली बोटं. हाताची बोटं वस्तुंना पकडण्यासाठी महत्वाची असतात. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या हाताची बोटं आणि त्यांचा आकार हा तुमच्या  व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो. 

Pooja Pawar | Feb 07, 2025, 13:24 PM IST
1/7

तुमच्या हाताच्या बोटांचा आकार कसा आहे यावरून तुमचं व्यक्तिमत्व समोरच्याला कळू शकतं. काहींची बोटं सरळ, काहींची टोकदार तर काहींची तिरकस असतात.   

2/7

सरळ बोटं असणे :

जर तुमच्या होताची बोटं ही सरळ असतील तर तुम्ही प्रामाणिकपणाला महत्व देणारे व्यक्ती आहात आणि तुम्हाला खोटारडेपणा आवडत नाही. तुम्ही स्वतः एक विश्वासू व्यक्ती असता आणि दुसऱ्यांकडूनही तुम्ही त्याच विश्वासाची अपेक्षा करता. तुम्ही मजबूत, स्वतंत्र आणि संयमित व्यक्ती असता. तुमची दया आणि करुन अशा लोकांसाठी चांगली आहे ज्यांना तुम्ही पसंत करता. 

3/7

टोकदार बोटं असणे :

जर तुमच्या अंगठ्या जवळील बोट हे टोकदार असेल तर तुम्ही स्वतःसाठी अनेक स्वप्न पाहणारी लोक आहात. तुम्ही प्रेमावर विश्वास ठेवता आणि तुम्ही जसे आहात तसे समोरच्याने तुम्हाला स्वीकारावे अशी अपेक्षा करता. 

4/7

तुमची मेहनत आणि निष्ठा तुम्हाला जीवनात येणाऱ्या समस्या दूर करण्यास सक्षम बनवते आणि समाज तुमची नेतृत्व क्षमता ओळखतो. परंतु तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी कारण तुमच्या दयाळूपणाचा आणि निष्ठेचा फायदा घेतला जाऊ शकतो. तुम्हाला दुसऱ्यांच्याप्रती सहानुभूती असते. 

5/7

तिरकस बोटं :

जर तुमची बोटं ही तिरकस असतील तर तुम्ही अतिशय शांत स्वभावाचे व्यक्ती आहात आणि तुम्हाला एकटेपणा आवडतो. सत्य आणि अखंडता ही तुमच्यासाठी महत्वाची मूल्य आहेत. जे सत्य आहे त्यावर असून राहिल्याने तुमची लोकप्रियता कमी झाली तरी देखील तुम्ही त्याची पर्वा करत नाही आणि त्यावर दृढ राहता. तुम्ही खुल्या विचारांचे आणि उदार व्यक्ती असता. तुमचा आत्मविश्वास  आणि स्टाईलने लोकांचं लक्ष वेधून घेता. 

6/7

परंतु जेव्हा तुमचा राग अनावर होती तेव्हा तो अतिशय तीव्र असतो. चूक झाल्यावर तुम्ही लगेच माफी मागता, परंतु त्या गोष्टी तुम्ही सहज सोडत नाहीत ज्या तुमचा आत्म-सम्मान दुखावतात. तुमच्या व्यक्तिमत्वात विनम्रपणा असतो आणि तुम्ही मैत्री टिकवून ठेवता. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)