नोव्हेंबरमध्ये होणार 'हे' मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

November New Rules:नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सर्व प्रमुख बदलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या बदलांमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंतच्या अनेक बदलांचा समावेश आहे.

| Oct 30, 2023, 13:05 PM IST

November New Rules: नोव्हेंबरमध्येदेखील अनेक बदल तुम्हाला दिसतील. या बदलांची आधीच माहिती असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

1/10

नोव्हेंबरमध्ये होणार 'हे' मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

November New Rules affect the common mans Utility Marathi News

New Rules From 1st November 2023: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यासह देशभराक अनेक बदल घडतात. अनेक नियम बदलत असतात. या बदलांचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. कधी गॅस, सिलींडरच्या किंमतीवर परिणाम दिसतो. तर कधी आरबीआय आपल्या बॅंकीग नियमांमध्ये थोडेफार बदल करत असते. 

2/10

बदलांची आधीच माहिती ठेवा

November New Rules affect the common mans Utility Marathi News

नोव्हेंबरमध्येदेखील असे अनेक बदल तुम्हाला दिसतील. या बदलांची आधीच माहिती असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

3/10

अनेक बदल

November New Rules affect the common mans Utility Marathi News

त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सर्व प्रमुख बदलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या बदलांमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंतच्या अनेक बदलांचा समावेश आहे.

4/10

एलपीजी सिलिंडर किंमत

November New Rules affect the common mans Utility Marathi News

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडर किंमतीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता असते. कधी या किंमतीत वाढ होते तर कधी घट देखील होऊ शकते. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात एलपीजी किंमती स्थिर असतील. या किमतींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच सध्याचे दर कायम ठेवले जातील, याची नागरिकांनी नोंद घ्या. 

5/10

GST चलन

November New Rules affect the common mans Utility Marathi News

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) नुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागणार आहे. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.

6/10

आयात संबंधित अंतिम मुदत

November New Rules affect the common mans Utility Marathi News

सरकारने HSN 8741 कॅटेगरीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. मात्र 1 नोव्हेंबरपासून काय होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

7/10

व्यवहार शुल्क

November New Rules affect the common mans Utility Marathi News

1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू असतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने याबद्दल माहिती दिली होती. 

8/10

शाळा, कॉलेजना सुट्ट्या

November New Rules affect the common mans Utility Marathi News

नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी सर्वांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता साधारण 12 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये सलग सुट्ट्या फार कमी आहेत. रविवारच्या सुट्ट्या मिळून एकूण 12 ते 15 दिवस सुट्टी मिळू शकते. पण तुमची शाळा, कॉलेज यावरील अंतिम निर्णय घेऊ शकेल.

9/10

10 दिवस शेअर मार्केट बंद

November New Rules affect the common mans Utility Marathi News

स्टॉक मार्केटमध्येही या महिन्यात सुट्ट्या आहेत. नोव्हेंबरमध्ये शेअर मार्केट 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईच्या शेड्युलनुसार या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सण, शनिवार आणि रविवार यांचादेखील समावेश आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला ट्रे़डिंग करता येणार नाही. पण दिवाळीच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. 

10/10

15 दिवस बॅंक बंद

November New Rules affect the common mans Utility Marathi News

RBI च्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यात बँका 4 किंवा 6 दिवस नाही तर तब्बल 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी, छठ पूजा, गोवर्धन पूजा यासह सर्व सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार या 15 दिवसांच्या सुट्टीचाही समावेश आहे.