आता WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी मोबाइल नंबरची गरज नाही?

WhatsApp वरील एका फिचरमुळे अनेकदा सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. ते म्हणजे व्हॉट्सअप वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. पण आता WhatsApp ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असून एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. 

May 25, 2023, 18:15 PM IST
1/10

WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp वर चॅटिगंसह, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.   

2/10

पण या प्लॅटफॉर्मवरील एका फिचरमुळे अनेकदा सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात. ते म्हणजे व्हॉट्सअप वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक द्यावा लागतो.   

3/10

पण आता WhatsApp ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असून एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे.   

4/10

WhatsApp वर युजरनेमसंबंधी अपडेट येण्याची शक्यता आहे.   

5/10

WhatsApp वर तसे अनेक नवे फिचर्स येणार आहेत. पण युजरनेम अपडेट हा त्यातील मोठा बदल असणार आहे. WABetaInfo नुसार, याच्या मदतीने युजर्स आपला युनिक आयडी तयार करत तो शेअर करु शकतात.   

6/10

या फिचरच्या मदतीने अन्य युजर्स नंबर नसतानाही तुम्हाला मेसेज करु शकतात. WhatsApp ग्रुपमुळे अनेक अज्ञात लोकांना आपला नंबर मिळतो अशी अनेक युजर्सची तक्रार होती.   

7/10

युजरनेमच्या सहाय्याने WhatsApp वापरकर्ते नंबरशिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकतात. यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.   

8/10

हे फिचर कधीपर्यंत येईल आणि त्याचं ध्येय फक्त नंबर लपवणं आहे की, इतर प्लॅटफॉवरील युजर्सही WhatsApp वर मेसेज पाठवू शकतात का हे स्पष्ट नाही.   

9/10

हे फिचर सध्या सुरुवातीच्या स्टेजवर आहे. गे कधीपर्यंत येईल यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.   

10/10

हे फिचर WhatsApp Android v2.23.11.15 वर स्पॉट करण्यात आलं आहे. जर तुम्ही बिटा व्हर्जन वापरत असाल तर हे फिचर हाताळून पाहू शकता.