Shark Tank India चे शार्क आहेत इतक्या कोटींचे मालक! अनुपम, नमिता कमाईत तळाशी तर सर्वात श्रीमंत शार्क...

Shark Tank India कार्यक्रम जितका प्रसिद्ध आहे तितकेच त्यामधील शार्कही प्रसिद्ध आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा रंगत असते. दरम्यान हे शार्क किती श्रीमंत आहेत याबद्दल जाणून घेऊयात...

Jan 27, 2023, 16:22 PM IST

Shark Tank India कार्यक्रम जितका प्रसिद्ध आहे तितकेच त्यामधील शार्कही प्रसिद्ध आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा रंगत असते. दरम्यान हे शार्क किती श्रीमंत आहेत याबद्दल जाणून घेऊयात...

 

1/7

Shark Tank Judges Property Networth

Shark Tank India चा दुसरा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. शार्क विनीता सिंह, अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पीयूष बंसल, अमित जैन आणि नमिता थापर आपल्या उद्योगांपेक्षाही शोमुळे जास्त प्रसिद्ध झाले आहेत. लोकांमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान अनेक उद्योजकांना मदतीचा हात देणारे शार्क यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? (Photos: Instagram)  

2/7

Shark Tank Judges Property Networth

अमित जैन शार्क टँक सीझन २ मधील सर्वात नवीन जज आहेत. त्यांनी अशनीर ग्रोव्हर यांची जागा घेतली आहे. अमित कारदेखोचे मालक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते व्यावसाय करत आहेत. 2007 मध्ये त्यांनी आपला भाऊ अनुराग जैनसह कंपनी सुरु केली होती. अमित यांची संपत्ती जवळपास 2900 कोटी इतकी आहे.   

3/7

Shark Tank Judges Property Networth

नमिता थापर मल्टिनॅशनल औषध कंपनी एमक्योरच्या सीईओ आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअप कंपनी आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी इतकी आहे.   

4/7

Shark Tank Judges Property Networth

पियूष बन्सल 'लेन्सकार्ट'चे सीईओ आहेत. अमेरिकेतील एका कंपनीत काम केल्यानंतर 2010 मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटींची आहे.   

5/7

Shark Tank Judges Property Networth

विनिता सिंह आयआयटी आणि आयआयएमच्या विद्यार्थिनी आहेत. एका प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रँडच्या त्या सह-संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 300 कोटी इतकी आहे.   

6/7

Shark Tank Judges Property Networth

अनुपम मित्तल या सीझनमधील सर्वात प्रसिद्ध शार्क आहेत. हजरजबाबीपणा आणि आपल्या स्टाइलमुळे ते प्रेक्षकांना आवडतात. ते शादी.कॉमचे सीईओ आहेत. त्यांची 185 कोटींची संपत्ती आहे.   

7/7

Shark Tank Judges Property Networth

अमन गुप्ता बोट इंडियाचे मालक आहेत. त्यांची कंपनी हेडफोन, इअरफोन, ट्रॅव्हल गॅजेट आणि स्पीकर तयार करते. 2015 मध्ये त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यांची एकूण संपत्ती 700 कोटी इतकी आहे.