वर्क फ्रॉम होम शोधताय, सावधान! 11 जणांना 66 लाख रुपयांचा गंडा... अशी आहे Modus Operandi

Cyber Crime : वर्क फ्रॉम होम आणि कमाईची चांगली संधी असल्याचं आमिष दाखवत सायबर  भामट्यांनी नाशिक शहरात 11 जणांना गंडा घातला.  11 जणांकडून भामट्यांनी तब्ब 66 लाख रुपये उकळले असून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 28, 2024, 21:22 PM IST
1/7

कोरोना नंतर देशात वर्क फ्रॉम होमची संकल्पना समोर आली.  नाशिकच्या काही तरुणांनी वर्क फ्रॉम होमसाठी ऑनलाइन सर्च सुरू केला. याचा फायदा काही सायबर भामट्यांनी  घेतला. जॉब सर्च करत असलेले पंकज मगन धामणे  आणि त्यांच्यासह इतर 11 जण नोकरीच्या शोधात होते. 

2/7

या सर्वांनी ऑनलाइन पोर्टलवर नोकरी शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. हीच संधी साधत या 11 जणांना सायबर भामट्यां कडून संपर्क करण्यात आला. यात त्यांना वर्क फ्रॉम होम आणि जास्त पगाराचा पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बनावाला नाशिक मधील 11 तरुण बळी पडले.

3/7

सायबर भामट्यांकडून कामाच्या शोधत असलेल्या 11 जणांना संपर्क करण्यात आला. भामट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिर्यादी धामणे आणि त्यांच्या इतर 11 जणांनी 13 जानेवारी 2023 ते 14 मार्च 2024 या कालावधीत एकूण 65 लाख 62 हजार 881 एवढी रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली.

4/7

पण जॉब मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धामणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

5/7

ऑनलाइन तसेच विविध मार्गाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यात महिलांचाही समावेश आहे. कुठे भिशी मध्ये जादा परतावा तर कुठे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवेल जात आहे

6/7

या वर्षभरात साधारण नाशिकमधील महिला आणि तरुणांना ऑनलाइन पद्धतीने 15 कोटींना रुपयांना गंडविण्यात आल्याचा रिपोर्ट आहे. त्या खालोखाल पैसे गुंतवणुकीतून दामदुप्पट रक्कम देण्याच्या आमिषातूनही अनेकांना गंडविण्यात आलं आहे.

7/7

ऑनलाईन व्यवहार करताना किंवा ऑनलाईन जॉब शोधताना कोणत्याही लिंकवर क्लिक करताना काळजी घ्या, किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं तर खात्री करुन घ्या असं आव्हान सायबर पोलिसांकडून सातत्याने केलं जात आहे.