रोहित, ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हसू हरवलं! लेकीच्या गॅदरिंगमधील 'हे' Photos पाहून चाहते चिंतेत
Rohit Sharma Ritika Sajdeh Expressions: मुंबई इंडियन्सच्या संघाने अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून त्याच्या जागी हार्दिक पंड्याची नियुक्ती केल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का तर बसलाच मात्र सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीचे लेकीच्या शाळेतील काही फोटो व्हायरल होत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर...
Swapnil Ghangale
| Dec 18, 2023, 09:29 AM IST
1/10
इंडियन प्रिमिअर लिगमध्ये एकूण 11 पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मा यंदाच्या म्हणजेच 2024 च्या पर्वात संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. इंडियन प्रिमिअर लिगच्या आगामी पर्वामध्ये हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शुक्रवारी करण्यात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
2/10
5 वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व अचानक बदलण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्र सिंग धोनी वगळता रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आपल्या संघाला 5 वेळा चषक जिंकून दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच गुजरात टायटन्सच्या संघातून स्वगृही परतलेल्या हार्दिक पंड्यावर आता मुंबईच्या संघाने नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
3/10
4/10
7/10