IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत

IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत

Saurabh Talekar | Dec 12, 2023, 20:20 PM IST

IND vs SA 2nd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज लग्नानंतर मुकेश कुमार हनीमूनऐवजी पत्नी दिव्या सिंहसोबत दक्षिण आफ्रिकेत (Mukesh Kumar Reached South Africa) पोहोचला आहे. 

1/7

हनिमून

मुकेश कुमारने नुकतेच लग्न केले आहे. पण क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो हनिमूनला जावू शकला नाही. 

2/7

मुकेश कुमार

मुकेश कुमार सध्या टीम इंडियासोबत आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तो त्याच्या पत्नीसोबत पोहोचला आहे.

3/7

पत्नी दिव्या

बीसीसीआयने सोशल मीडियावर भारतीय संघाचा गेकेबरहा येथे पोहोचण्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यात मुकेश कुमार पत्नी दिव्यासोबत दिसत होता.

4/7

भारतीय संघांचा भाग

मुकेश कुमार आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या दोन फॉर्मटमधील भारतीय संघांचा भाग आहे. 

5/7

टी-20 मालिका

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

6/7

लग्नाची सुट्टी

मुकेश कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातून लग्नासाठी सुट्टी घेतली होती. बीसीसीआयकडे मुकेशने परवानगी मागितली होती.

7/7

बनियापूर बेरूई गाव

मुकेशची जीवनसाथी दिव्या सिंह छपराच्या बनियापूर बेरूई गावची रहिवासी आहे. मुकेश-दिव्याची एंगेजमेंट याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाली होती.