देशातील सर्वात महागडा 'एक्स्प्रेस वे', तयार व्हायला लागले 22 वर्ष; टोल तर विचारूच नका!

Most Expensive Expressway of India: भारतात रस्ते विकासाचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलं जातंय. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक एक्स्प्रेस वे आणि हायवे बनवले जात आहेत. मात्र, तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या एक्स्प्रेस वे बद्दल माहितीये का?

Saurabh Talekar | Sep 02, 2024, 18:16 PM IST
1/6

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

देशातील सर्वात जुना आणि महागडा द्रुतगती मार्ग म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. हा देशातील पहिला 6 लेन हायवे देखील आहे. दोन व्यस्थ शहरांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग नेहमी गजबजलेला असतो.

2/6

पायाभरणी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 मध्ये या एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली होती. मात्र, त्याआधीच 2000 मध्येच हा एक्स्प्रेस वे काहीअंशी खुला करण्यात आला होता. 

3/6

द्रुतगती मार्गाची लांबी

तुम्हाला माहिती नसेल तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वे तयार बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली. या द्रुतगती मार्गाची लांबी फक्त 94.5 किलोमीटर आहे.

4/6

कळंबोली - किवळे

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे नवी मुंबईतील कळंबोली भागातून सुरू होऊन पुण्यातील किवळे येथे संपतो. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो तसेच निसर्गरम्य सह्याद्रीचं नेत्रदीपक दृष्य पहायला मिळतं.

5/6

खर्च किती?

मुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या उभारणीसाठी 1,63,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्यामुळे तुम्हाला एका मार्गासाठी 320 रुपये टोल भरावा लागतो. 

6/6

टोल किती?

तर टेम्पोसाठी एकेरी टोल टॅक्स 495 रुपये आहे. बससाठी टोल दर 940 रुपये इतका आहे. डबल एक्सल ट्रकसाठी 685 रुपये, तीन एक्सल ट्रकसाठी 1,630 रुपये आहे. तर मल्टी एक्सल ट्रकसाठी 2165 रुपये टोल भरावा लागतो.