म्हाडाची बंपर लॉटरी; 10 हजार घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात सोडत

म्हाडाच्या 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत निघणार आहे.कोकण, पुणे, संभाजीनगर मंडळातील घरांचा समावेश आहे. 

Aug 17, 2023, 21:36 PM IST

Mhada Lottery 2023 : हक्काच्या घराचे स्वप्न पाहण्यासाठी एक गूड न्यूज आहे. म्हाडाच्या 10 हजार घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात सोडत काढली जाणाराय. यात पुण्यातील 5 हजार, कोकण मंडळाचे अंदाजे साडेचार हजार तर संभाजीनगरातील 600 घरांचा समावेश आहे. 25 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

1/7

म्हाडाच्या 10 हजार घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात सोडत काढली जाणार आहे.   

2/7

यात पुण्यातील 5 हजार, कोकण मंडळाचे अंदाजे साडेचार हजार तर संभाजीनगरातील 600 घरांचा समावेश आहे. 

3/7

25 ऑगस्टला घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

4/7

या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे.

5/7

या सोडतीच्या जाहिरातीची तयारी पूर्ण झाली आहे.   

6/7

नुकतीच मुंबईत म्हाडाच्या 4080 घरांच्या लॉटरीची सोडत निघाली होती. 

7/7

हक्काचे घराचे स्वप्न पाहणारे म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात.